पोस्ट्स

कर्नाटक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एक दिवस रावसाहेबांच्या शहरात

इमेज
मराठीतील एक ख्यातनाम सिद्धहस्त लेखक म्हणून आपण पु. ल. देशपांडे  यांना ओळखतो.  पु. ल देशपांडे यांची बटाट्याची चाळ या लेखनासह त्यांनी आपल्या प्रतिभेने साकरलेली व्यक्तिचित्रे सुद्धा मोठ्या संख्येने प्रसिद्व आहेत.या व्यक्तिचित्रांपैकीच एक म्हणजे सहज बोलता बोलता  शिव्या देणारे, प्रचंड तिखट खाणारे मात्र आतुन अत्यंत प्रेमळ स्वाभाव असणारे बेळगावचे रहिवासी रावसाहेब. बेळगाव,  आपल्या मराठी भाषिकांची अस्मिता, जागृत ठेवणारे ठिकाण म्हणजे बेळगाव.तर या बेळगावला मी नुकतीच माझ्या 'एक दिवशीय भ्रमंती' या उपक्रमाद्वारे भेट दिली. त्यावेळी आलेल्या अनुभवांचे सार मंडण्यासाठी प्रस्तूत लेखन तर वाचक मित्र मैत्रींणोंनो, माझ्रा एकदिवशीय भ्रमंतीची सुरवात नेहमीप्रमाणे झाली ती रात्री अकरा वाजता, पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातून सुटणाऱ्या नॉर्थ ईस्ट कर्नाटक परिवहनच्या शिर्डी -बेळगाव नॉन एसी स्लिपर बसने. या बसने प्रवास करत पावणे सहाच्या सुमारास मी बेळगावच्या बसस्टँडवर पोहोचलो.बेळगावचे बसस्टँड मोठे असून या ठिकाणी ३७ प्लॅटफॉर्म आहेत.मी गेलो त्यावेळी नुकतेच उजाडत होते.माझ्या आतापर्यंतअनुभवानुसार परक्या...

या सारखे बदल आपल्या एसटीत कधी होईल ?

इमेज
       मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एसटी संदर्भात तीन बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या त्यातील एक गोष्ट महाराष्ट्राच्या एसटी संदर्भात होती तर दोन बातम्या कर्नाटकच्या एसटी संदर्भात होत्या .महाराष्ट्राच्या एसटी संदर्भातील  बातमी विषयी आता पर्यंत बरेच बोलणे गेले आहे त्यामुळे मी त्यावर बोलणार आंही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते कर्नाटकाच्या एसटी संदर्भात प्रसार माध्यमामध्ये आलेल्या बातम्यांविषयी .. या बातम्या समजून घेण्याच्या आधी आपणास कर्नाटक एसटीची रचना कशी आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे   तर मित्रानो , सध्या आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला ज्या समस्या भेडसावत आहे त्या प्रकारच्या समस्या काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या एसटीला देखील जजाणवत होत्या . या समस्येला तोंड देण्यासाठी कर्नाटकाच्या एकछत्री एसटीचे विभागवार विभाजन करत नॉर्थ वेस्ट कर्नाटक एसटी नॉर्थ ईस्ट कर्नाटक एसटी , कर्नाटक एसटी , बंगलोर कर्नाटक एसटी आदी एसटी महामंडळाची निर्मिती केली . त्यानंतर या विभागाची कर्नाटक राज्यांतर्गत स्पर्धा घेत त्याद्वारे आपला दर्जा वाढवला आजमितीस संपूर्ण भारतात...

जखमेवर मीठ !

इमेज
                १ नोव्हेंबर २०२० रोजी कर्नाटक राज्याच्या ६५वा स्थापना दिवस झाला . त्यानिमित्याने कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना बेळगाव निपाणी भालकी या शहरातील आणि आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आपल्या संबोधनात त्यांनी महाराष्ट्र सीमाप्रश्न संपल्याचे आणि बॉम्बे कर्नाटक या प्रादेशिक भागाचे कित्तूर कर्नाटक असे नामकरण करत असल्याचे जाहीर केले . एकाचवेळी राज्याच्या संस्थापक दिनाला कोरोना संसर्गाची भीती न बाळगळता कार्यक्रम केले . मात्र मराठी भाषिकांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावे या साठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावच्या कार्यक्रमला परवांनगी नाकारली . कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांवर अत्यंत अत्याचार करण्यात येतात . त्यांना त्यांच्या इच्छेविरुध्द्व सक्तीने कन्नड भाषेत व्यवहार करण्यास भाग पाडले जाते . त्यामुळे तेथील जनता महाराष्ट्रात येण्यास आसुसलेली आहे .  भागाचे नाव बदलून या भागाशी असणारी महाराष्ट्राची नाळ पूर्णपणे तोडण्याची पूर्ण तयारी केल्याच...

कोल्हापूर,सोलापूर दोन टोके

इमेज
          काही महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. मी सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये  गेलो होतो. सोलापूर आणि कोल्हापूर हे महाराष्ट्रातील कर्नाटकला लागून असणारे जिल्हे आहेत. कर्नाटकमधील मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हे जिल्हे सिमा शेअर करतात. सोलापूर जिल्हा कर्नाटकच्या मुंबई कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर हैद्राबाद कर्नाटक या प्रादेशिक भागाबरोबर सीमा शेअर करतो. मी दोही शहरांमध्ये प्रत्येकी तीन चार दिवस मुक्काम केला. या दरम्यान मला जाणवलेले घटक आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन                 कोल्हापूरपासून कागलच्या दिशेने25 किमी गेल्यावर कर्नाटक राज्य सुरु होते. मात्र कोल्हापूरमध्ये सर्वत्र मराठीचा प्रभाव ठळकपणे जाणवतो. नाशिक किंवा पुण्यात फिरतोय असा भास व्हावा इतके मराठीमय वातावरण या ठिकाणी जाणवते.मी भूगोलाच्या मानवी भूगोल या शाखेचा विद्यार्थी आहे.  त्यावेळी अभ्यासताना मिळालेल्या ज्ञानानुसार सांगतोय. कोणत्याही प्रकारचा मानवी समुह हा बटण दाबल्यावर ज्याप्रकारे लाइट लागतो, अथवा बंद होतो, त्याप्रकारे एखादा विभाग...

अन्य राज्य परिवहन महामंडळ आणि आपली MSRTC

इमेज
                    नुकताच काही अपरिहार्य कारणास्तव महाराष्ट्राची एसटी बस सोडून प्रत्येकी एकदा  कर्नाटक आणि गुजरात राज्यच्या एसटी बसने प्रवास करावा लागला . या प्रवाश्यादरम्यान मला वाढलेली गोष्ट म्हणजे संबंधित राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची रचना . .आपल्या महाराष्ट्राच्या बसेसपेक्षा कर्नाटकाच्या बसेस लांबीने थोड्या मोठ्या होत्या . तसेच त्या बसेसमध्ये एका रांगेत 5आसने होती . गुजरातची एसटी आपल्या महाराष्ट्र्राच्या बसेसपेक्षा लांब नव्हती याही बसमध्येएका रांगेत 5आसने होती . आपल्या महाराष्ट्राच्या बसेसमध्ये पूर्र्वी 5आसने होती . मात्र कालांतराने आरामदायी प्रवाश्यांचा प्रवास आरामदायी करण्याच्या हेतून आपल्या बसेस मध्ये एका रांगेत फक्त 4असणे ठेवण्यात येऊ लागली . मात्र या बसेसमध्ये अजून एका रांगेत पाच आसने आहेत . आपली आसने कमी का करण्यात आली ? पूर्वीप्रमाणे एका रांगेत पाच आसने असावीत . यासाठी मी एसटीच्या एका अधिकाऱ्याशी  नंतर संवाद साधला असता त्याने आपली भौगोलिक परिस्थिती कर्नाटक आणि गुजरात पेक्षा भिन्न असल्याने ते ...

महाराष्ट्राच्या एसटीला पडलेला अजगराच्या विळखा

इमेज
                                    काल सायंकाळची गोष्ट आहे . सहजच युट्युबवर फेरफटका मारत होतो . त्या फेरफटका दरम्यान एक व्हिडिओ समोर आला . व्हिडीओच्या पार्श्वभुमीवर  परीवहन महामंडळाच्या बसेस दिसत  असल्याने उत्सुकतेपोटी व्हिडीओ बघीतला .आणि क्षणभर काय प्रतिक्रिया द्यावी, हे सुचेनाच. व्हिडीओमध्ये नाँर्थ वेस्ट कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनचा एका बसविषयी माहिती सांगण्यात आली होती . सदर बस निपाणी येथून सुटुन 500 किमीचा प्रवास करत महाराष्ट्राचा औरंगाबाद येथे जात होती . मित्रांनो तूम्हाला यात फारसे वावगे वाटणार नाही कदाचित .पण मित्रांनो सदर बस जे 500 किमीचा प्रवास करत होती , त्यातील महाराष्ट्राचा वाटा होता 485 किमीचा , तर कर्नाटकाचा वाटा होता फक्त 15 किमीचा .या बसचे वेगळेपण इथेच संपत नाही . सदर बसचा मार्ग देखील महाराष्ट्राचा प्रचंड अभ्यास करून काढला असल्याचे दिसत होते . महाराष्ट्रात कोल्हापूर येथे आल्यावर  नेहमीचा कोल्हापूर पुणे अहमदनगर अशा मार्ग न निवडता सातारा फलटण नीरा दौड...

या लोंढ्याना आवरणे काळाची गरज (भाग 3 )

इमेज
            काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे , जेव्हा महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यात तणाव निर्मण झाल्याने दोन्ही राज्यातील राज्य परिवहन महामंडळाची सेवा बंद होती . त्या वेळेस  एक महाराष्ट्र एसटी प्रेमी म्हणून मी महाराष्ट्र एसटीचे किती नुकसान झाले असेल? असा विचार आल्याने  म्हणून जेव्हा माहिती गोळा करण्यास सुरवात केली तेव्हा छातीत धस्स व्हावे अशी आकडेवारी माझ्यासमोर आली . महाराष्ट्राच्या एसटीला धोका म्हणून खाजगी बससेवांकडे बोट दाखवले जाते मात्र ते अयोग्य असून महाराष्ट्र एसटीला खरा धोका अन्य राज्यांच्या परिवहन सेवांकडून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करणारी ती आकडेवारी होती . मला समस्त कर्नाटकची आकडेवारी मिळाली नाही फक्त बेळगाव या शहराची आकडेवारी मिळाली , मात्र शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने समस्त कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तोच न्याय लावायला हरकत नसावी . तर मित्रानो , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या 16 मार्गावरून बसेस बेळगावला जातात . तर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस बेळगावहून 31मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करतात . या सर्व मार्गां...

महाराष्ट्रत्तेर एस टी एक समस्या

इमेज
नुकतीच  मी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाला रात्री भेट दिली . तेथील दृश्य बघून  मी थबकलोच,  आपण महाराष्ट्रात नसून कर्नाटकमध्ये असल्यासारखा भास व्हावा असे ते दृश्य होते .  महाराष्ट्रातील मध्यवर्ती भागातील शहर असूनही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कर्नाटकच्या बसेसची संख्या जास्त होती . मागे मी हा प्रकार कोल्हापूर बसस्थानकावर बघितला होता .मात्र  कोल्हापूर कर्नाटक  सीमेपासून निव्वळ २५ किमी असल्याने मी हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता . त्यानंतर याविषयीची अधिक माहिती मिळावी म्हणून कर्नाटक राज्य परिवहनाच्या  संकेतस्थळावर भेट दिली असता तेथील माहिती झोप उडवणारी होती. कर्नाटक सरकार राज्याबाहेर दुसऱ्या राज्यातील ४० मार्गावर सेवा पुरवते या ४० पैकी २९ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत .  मागे मी एकदा कराडला गेलो असता मी बेळगाव ते नीरा या मार्गावरील कर्नाटक परिवहन महामंडळाची बस ब घितली होती . मित्रानो नीरा हे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत असणारे गाव आहे . म्हणजेच तुम्ही समजू शकता कर्नाटक किती आतापर्यंत पोहोचले आहे . नाशिकहून बेळ...

महाराष्ट्राची एसटी आणि अन्य राज्यातील एसटी एक तुलना

इमेज
                मी नुकताच पुणे नाशिक कर्नाटक परीवहन महामंडळाच्या व्होल्वो गाडीने  तर नाशिक पुणे गुजरात परीवहन महामंडळाच्या साध्या बसने  प्रवास केला. त्यासाठी मला  अनुक्रमे 460 आणि 260 रुपये लागले .  त्यावेळी आलेल्या अनुभवाचे हे कथन               महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या शिवशाही या बसचे नाशिक पुणे भाडे 410 रुपये आहे. याउलट अत्यंत कमी कर असल्याने कर्नाटकच्या व्होल्वाबस चे भाडे 460 रुपये आहेत. आता नाशिक पुणे शिवनेरी बंद आहेत. मात्र त्या जेव्हा चालू होत्या तेव्हा त्यांचे भाडे 600 रुपये होते. शिवनेरी बस बंद केल्यावर 18% भाववाढ करण्यात आली . त्यानुसार त्यांचे भाडे 108 रुपयांनी वाढून 708 रुपये झाले असते . मी गुजरातच्या बस डायव्हर यांच्यासी एकदा बोललो असता त्यानी सांगितले होते की "आम्ही महाराष्ट्रात ज्या  सेवा देतो  त्यांचे वेळापत्रक  महाराष्ट्र तयार करतो  जर आम्ही तयार केले तर तुमचे डब्बे मोकळे फिरतील...