पोस्ट्स

जुलै १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलत्या हवामानाचा विळखा घट्ट

इमेज
          मानवास  बदलत्या हवामानाचा विळखा दिवसोंदिवस घट्ट होत असल्याचे साध्य जागतिक हवामानबदलवियी ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून स्पष्ट होत आहे . १९ जुलै २०२२ ही तारीख या मगरमीठीच्या इतिहासात महत्त्वाची तारीख म्हणून नोंदलेली जाईल या दिवशी लंडनच्या इतिहासात पहिल्यांदाच ४० अंश २ शतांश नोंदवले गेले . सोमवार रात्र आणि मंगळवार पहाट  लंडनला सलग दुसरी जास्त तापमान असलेली रात्र म्हणून नोंदवली गेली आहे . वाढत्या तपमानामुळे लाकडाच्या जास्त वापर केलेल्या काही घरांना आगी देखील लागल्या . सुदैवाने या आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्याने प्राणहानी झाली नाही आजमितीस समस्त पश्चिम युरोप प्रचंड अश्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे . या आगीमुळे फ्रान्सच्या नैऋत्य दिशेला ( साऊथ वेस्ट ) तसेच स्पेन पोर्तुगाल या दिशेला असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणत वणवा लागत आहे . युनाटेड किंग्डम देशात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे लंडनला विमानतळावर असलेली धावपट्टी वितळल्याने विमाने दुसऱ्या विमानतळावर नेण्याची वेळ तेथील विमानतळ प्रशासनावर आली आहे . युनाटेड किंग्डम देशात रेल्वेसेवा बंद पडण्याची वेळ