पोस्ट्स

सप्टेंबर १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब....... बुद्धिबळाचा (भाग 7)

इमेज
                  भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडच्या  उपांत्य फ़ेरीत पराभव अमेरिकेकडून पराभव झाल्यावर आता त्या मागच्या कारणांचा शोध घेण्यास सुरवात झाली आहे . महाराष्ट्रातील पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्या मते दोन कारणामुळे भारतीय बुद्धिबळ संघास बुद्धिबळ ऑल्मियाडमध्ये पराभवास सामोरे जावे लागले एक म्हणजे अमेरिकेविरुद्धचा पहिल्या डावातील विजयानंतर भारतीय बुद्धिबळपटू गाफील राहिले त्यांनी दुसऱ्या डावात आवश्यक  तेव्हढी सावधगिरी  दाखवली नाही  आपण खेळात सातत्याने सावध असायलाच हवे नाहीतर होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही याची झलक भारतीय बुद्धिबळपटूंनी उपउपांत्य फेरीत युक्रेनविरुद्धचा दुसऱ्या डावात अनुभवली होती.  मात्र यातून योग्य तो धडा घेत आपल्या कार्यप्रणालीत योग्य ते बदल करण्यास भारतीय बुद्धिबळपटू कमी पडले ज्याची किंमत त्यांना अमेरिकेकडून पराभूत होऊन चुकवावी लागली . खेळाडूंसाठी मनाची एकाग्रता समतोल किती आवश्यक आहे याविषयी मीमाजी पोलीस अधिकरी क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम सरांचे एक व्याख्यान ऐकले होते . त्याची पुन्हा एकदा आठवण मला  ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांचे हे मत ऐकून झाली