पोस्ट्स

मे २६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताची खेळी आणि चीनची कोंडी

इमेज
           सध्या आपल्या भारताच्या शेजारील  असलेले सबंध एका महत्तवाच्या वळणावर आहेत . चीन या देशाबाबत तर अनेक घडामोडी घडत आहे .त्यातील मोजक्या घडामोडीबाबत मराठी प्रसारमध्यमांमध्ये भाष्य करण्यात आले . ज्या घडामोडीबाबत माध्यमांमध्ये सांगण्यात आले त्यामध्ये नेपाळची घुसखोरी, चीन आणि भारतीय लष्कर यामध्ये झालेली झडप आदी मुद्यांचा समावेश करता येतो.मात्र याखेरीज एका महत्तवाच्या मुद्याबाबत मराठी माध्यमांमध्ये काहीही सांगण्यात आलेले मला दिसले नाही, तो म्हणजे तैवान या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला लोकसभेच्या  दोन खासदारांनी लावलेली उपस्थिती .दिल्ली येथून भाजपाच्या खासदार असणाऱ्या मिनाश्री लेखी.आणि राजस्थानतील चुरू येथून  भाजपाचे खासदार असणारे राहुल  कास्वा . ते दोन खासदार.                                               मित्रांनो, आपण ज्याला चीन म्हणतो  ज्याचे अधिकृत नाव आहे ,पिपल्स रिपबल्कीक आँफ चायना (PRC)या देशाचे स्वतंत्र तैवानबाबत धोरण अत्यंत आक्रमक आहे .PRC तैवान ला स्वतंत्र देश न मानता आपल्याच देशातील फुटून निघालेला प्रांत मानतो . जो देश तैवानशी  राजकीय संबंध ठेवू इच्छितो, त्य