पोस्ट्स

मे २०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंताकडे वेगाने वाटचाल!

इमेज
                 आपल्याकडे कोरोना, कोरोनापश्चात प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होणारा बुरशीजन्य आजार, तेक्तो चक्रीवादळामुळे होणाऱ्या नुकसानीचे वार्तांकन करताना, माध्यमे थकत नसताना, समस्त जगाच्या छातीचे ठोके वाढवणारी घटना  घडली आहे. अंटार्टिका या क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावरील खंडावरील  विस्तृत अस्या  हिमनगापैकी 175 किमी लांबी आणि 25 किमी रुंदीचा हिमनग तूटला आहे. आपल्या भारताची राजधानी नवी दिल्लीपेक्षा हे क्षेत्रफळ तिपट्टीने जास्त आहे. अटार्टिका खंडाच्या पश्चिमेस असलेल्या रोम हिमखंडानजीक weddle समुद्रात हा हिमनग तूटला आहे   हा हिमनग जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने एक क्रमांकाचा हिमनग आहे. शास्त्रज्ञांनी याचे नामकरण A76 असे केले आहे.. काही दिवसापुर्वीच अंटार्टिकामध्ये त्या वेळच्या सर्वात मोठा हिमनग तूटला होता.(ज्याचे नामकरण शास्त्रज्ञांनी a68a असे केले होते) आताचा हिमनग त्याहीपेक्षा मोठा आहे. युनाटेड किंग्डमच्या अटार्टिका खंडाचे अध्ययन करणाऱ्या शास्त्रज्ञांना तो पहिल्यांदा आढळला होता. पुढे युरोपीय स्पेस एजन्सीच्या उपग्रहामार्फत अधिक संशोधन केल्यावर याची घोषणा करण्यात आली. जगा