पोस्ट्स

मार्च ८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महिला बुद्धिबळपटूची गरुडझेप

इमेज
          सध्या सर्व भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक भारतात सुरक्षितपणे कशे परत येतील याच्या चिंतेत असताना  मन प्रसन्न करणारी बातमी भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रातून येत आहे नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या ४७ व्या  राष्ट्रीय महिला खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय प्रियंका नुटक्की या आंध्र प्रदेशातील बुद्धिबळपटूने महिला ग्रँडमास्टर हा 'किताब मिळवला, हीच ती आनंदाची बातमी प्रियंका नुटक्की भारताच्या २३ व्य महिला ग्रँडमास्टर आहेत याचा काही महिने आधीच नागपूरच्या दिव्या देशमुख या भारताच्या २२  व्या महिला ग्रँडमास्टर झाल्या होत्या (  भुवनेश्वर येथे झालेल्या  राष्ट्रीय महिला खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद त्यांनीच मिळवले आहे ) काही महिन्याच्या अंतराने भारताला दोन महिला ग्रँडमास्टर मिळाल्याने भारताच्या  बुद्धिबळ क्षेत्रात महिला देखील आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वच क्षेत्रात अधिक समस्येला तोंड द्यावे लागते त्यापासून बुद्धिबळ क्षेत्र देखील सुटलेले नाही त्याच पार्श्वभूमीवर हे यश जोखायला हवे          त्यांनी त्यांचा पहिला ग्रँडमास्टर नॉब जानेवारी २०