पोस्ट्स

जून १६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय

इमेज
      राज्यातील तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय बुधवार १५ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला . महाराष्ट्र लोकसेवा अयोगकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची संख्या वयोमर्यादा संपेपर्यंत  अमर्याद करावयाचा निर्ययाचे या शिवाय अन्य दुसऱ्या शब्दात वर्णन करता येणे अशक्यच . मुळात आधीच अवास्तव असलेली वयोमर्यादा (खुल्या गटासाठी ३८ वर्षे तर विविध प्रकारची आरक्षण असल्यास त्या पेक्षा अधिक )  कमी करण्याची गरज असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात या निर्णयामुळे भविष्यात आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्यास आश्चर्य वाटायला नको आतापर्यंत एकाच स्वप्नील लोणकर महारष्ट्राने बघितला आहे मात्र या निर्णयाने भविष्यात असे कितीतरी स्वप्नील निर्माण होण्याचा धोका या निर्ययाने उत्पन्न केला आहे  .  मुळात अत्यंत कमी जागेसाठी निघणारी भरती, मात्र  परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारी अमर्याद संख्या यांचा एकत्रित परिपाक म्हणजे अत्यंत मरणाची गळेकापू स्पर्धा असे राज्यसेवेच्या परीक्षेचे स्वरूप आहे त्याला चाळिशच्या जवळपास पोहोचणाऱ्या वयोमर्यादेपर्यंत प्