पोस्ट्स

सांस्कृतिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माळराने", या दुर्लक्षीत पर्यावरण घटकाला समर्पित दिवाळी अंक "भवताल"

इमेज
          आपल्या महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेला आहे . या परंपरा खुपचं विलोभनीय देखील आहेत . काही परंपरा तर फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही आढळतात . दिवाळीला खाद्य फराळाबरोबर बौद्धिकफराळ देणारे खास दिवाळी निमित्त देणारे दिवाळी अंक हे फक्त महाराष्ट्रातच आढळणाऱ्या   परंपरेचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल . सुरवातीला फक्त कथा कविता असे साहित्य असणारे दिवाळी अंक आता या   कथा कवितांखेरीज अनेक माहितीपुर्ण लेखांनी भरलेली असतात . ही माहिती विविध क्षेत्रांची असते . एका विशिष्ट क्षेत्रांची सखोलपणे माहिती देणारे दिवाळी अंक देखील अनेक आहेत . एका विशिष्ट विषयाला धरून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात " भवताल "  हा आपल्या लेखांमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . त्यांचा 2023 चा अंक मी नुकताच वाचला .       गेल्या १०वर्षापासून पर्यावरणाशी सबंधित एक संकल्पना घेवून प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकाची या वर्षाची संकल्पना आहे , माळराने ....

भाउबीज विशेष

इमेज
उद्या दिवाळीचा शेवटचा दिवस अर्थात भाउबीज , भाउ आणि बहीणीचा नात्याचा हा दिवस आजच्या दिवशी पुरुषाने आपल्या पत्नीचा हातचे न खाता , आपल्या बहीणीचा हातचे खाणे शुभ मानले जाते . आजच्या दिवशी यमुना नदीने आपला भाउ यम यास ओवाळले होते . त्यामुळे प्रसन्न होवून आजच्या दिवशी जी स्त्री आपल्या भावाला ओवाळेल , त्या दोघांना दिर्घायू मिळेल , असा आशिर्वाद दिला . ज्यामुळे याला यमद्वितीया असे देखील म्हणतात .     कायस्थ समाजबांधव    या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत - टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात . या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात . या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे . यम आणि यमी या भावा - बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे द...