पोस्ट्स

ऑगस्ट २८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवा तूझे काउंटडाऊन सुरु झाले आहे .

इमेज
               सध्या समस्त भारतीय वृत्तवाहिन्या एका हिंदी अभिनेत्याचा मृत्यबाबत पोलिसांच्यापेक्षा अधिक गतीने तपास करत असताना मानवजातीचे पृथ्वीवरचे दिवस भरले असल्याचे सुचित करणाऱ्या अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र भारतीय  वृत्तवाहिन्या याबाबत काहीच बातम्या दाखवताना दिसत नाहीये . तर मित्रांनो मी सदर लेखन करत असताना भारताच्या बिहार , आसाम, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांसह पाकिस्तानातील सिंध प्रांत(त्यातही कराची शहर) आणि उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका आदी देशात बदलत्या हवामानाने तेथील प्रशासनाला अक्षरशः.रडकुंडीला आणले आहे. बिहार ,आसाम, हिमाचल प्रदेश , गुजरात ,सिंध आदी भागात अत्यंत कमी वेळात पडलेल्या अतिमुसळधार पावसाने प्रचंड प्रमाणात पुर आलेले आहेत . तर उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, अमेरीका आदी देशात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेच्या आलेल्या वादळाने तेथील जनजीवन विस्कळीत केले आहे, आणि हे सर्व घडत आहे , जगात तिव्रतेने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे .                              सध्याचा हवामान बदलाचा वेग बघून, हवामानशास्त्रज्ञांंनी या आधीच आमचे ज्ञात हवामानशास्त्र