पोस्ट्स

जुलै ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिने चित्रीकरणाचा बादशाहा. .. गुरुदत्त

इमेज
आपल्या सभोवताली अनेक निष्णात माणसे असतात. ती आपल्या क्षेत्रात इतकी निष्णात असतात की, त्या क्षेत्रासाठी त्या व्यक्तींचे नाव घेतले तरी पुरेसे ठरते. त्यांच्या विषयी अधिक काही सांगावे लागत नाही. आपल्या बाँलीवूडच्या विचार करता वसंतकुमार शिवशंकर पदूकोण, अर्थात गुरुदत्त  यांचे नाव अस्याच निष्णात व्यक्तींचा यादीत अग्रक्रमाने येते. काय नव्हते गुरुदत्त . गुरुदत्त सिनेदिग्दर्शक होते अभिनेता होते, नृत्यदिग्दर्शक होते. सिनेनिर्माते होते, गुरुदत्त. येत्या शुक्रवारी अर्थात 9 जूलै रोजी त्यांची जयंती त्या निमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली.     कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजेड यांची सांगड घालून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करायचे?  जे अत्यंत परीणामकारक ठरेल.तसेच पडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजप चेहऱ्याचा वापर वापर छायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेच कँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता  आपल्याला एकच नाव घ्यावे लागते ते म्हणजे गुरुदत्त     सन 1959साली आलेल्या कागज के फूल या चित्रपटातील 'वक्त ने किया सितम" या गाण्याचा सुरवातीला आपणास जो अंधार आणि उजेडाचा खेळ दिसतो तो त्यांची अंधार आणि प्रकाशा

स्पर्धा परीक्षेच्या नावाने (भाग2)

इमेज
       माझ्या कालच्या स्पर्धा परीक्षेच्या लेखावर प्रतिक्रिया देताना काही जणांनी या परीक्षार्थींवर ज्या गोष्टीने ताण येतो, ते म्हणजे पुणे सारख्या ठिकाणी राहणे खरेच गरजेचे असते का ? याबाबत विचारणा केली, तर त्या प्रश्नांविषयी सांगण्यासाठी ही पोस्ट.                 या परीक्षार्थींना पुण्यात राहणे खरेच आवश्यक असते का? याचे एका शद्बात किंवा वाक्यात उत्तर देणे अशक्य आहे. यासाठी या परीक्षांसाठी कोणत्या प्रकारच्या अभ्यासाची पद्धत आवश्यक असते. हे माहिती करुन घेणे आवश्यक असते.  या परीक्षेचा अभ्यासक्रम खुपच विस्तृत असतो,  त्यामुळे याचा अभ्यास करताना कदाचित अवांतर गोष्टींंचांच अभ्यास केला जावू शकतो. जसे  मराठी, इंग्रजी  सुधारण्यासाठी मराठी आणि इंग्रजी वाचन करताना  जी पुस्तके वाचून काहीच मराठी, इंग्रजी सुधारणार नाही, असी पुस्तके , दैनिके वाचणे वगैरे.या परीक्षांचा अभ्यास विस्तृत असला तरी एका विशिष्ट दिशेने करावा लागतो. मार्ग चूकला तर खुप अभ्यास करुनही काहीच उपयोग नाही. तसेच या प्रकारच्या अभ्यासात सातत्याने परीक्षण आवश्यक असते. या अभ्यासातील आपला कमकुवत अभ्यास घटक कोणता ? आणि चांगला हुकुमत असणारा घटक