पोस्ट्स

नोव्हेंबर १४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अजून किती अपघात बळी ?

इमेज
                           आज  दुपारी सहज व्हॉट्सअप बघता असताना एका गृपवर एक बातमी बघितली, आणि  काही क्षण काहीच सुचेना . नाशिकच्या सुप्रसिधद गायिकेच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघाती मृत्यूची ती बातमी होती . रस्त्यावरील एका कुत्र्याला वाचवण्याच्या नादात त्याची कार  रस्त्यावर थांबलेल्या एका टँकरवर आदळून सदर अपघात झाला होता . काही वर्षांपूर्वी स्वतःच्या लग्नासाठी मुंबईहून नाशिकला येणाऱ्या एका पत्रकाराचा अश्याच एका ट्रकमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची त्यामुळे मला चटकन आठवण झाली . मी स्वतः  नाशिक ते पुणे अनेकदा  प्रवास करतो .त्या दरम्यान मी सुद्धा अनेकदा  बघतो की  , ऊस हंगाम सुरु झाल्यावर अनेक ट्रक अत्यंत  धोकादायक स्थितीत चालवले जातात . मात्र त्यावर वाहतूक खाते काहीच कार्यवाही करत नाही . अवजड माल वाहतूक धोकादायक परिस्थितीत करायलाच पाहिजे, अशा नियम आपल्या भारतात असावा  का ? असे मला यातून वाटते .                  मी कोकण रेल्वेने अनेकदा प्रवास केला आहे , तेव्हा प्रवासात मला अनेकदा मालट्रक रेल्वे वॅगनवर चढवून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे बघितले आहे . हा प्रकार अन्य ठिका