पोस्ट्स

डिसेंबर ३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खाजगी रेल्वे विरुद्ध तोट्यातील सरकारी रेल्वे (भाग 1)

इमेज
                         गेल्या काही दिवसांपासून दोन बातम्यांनी भारतीय रेल्वेविश्व अक्षरशः ढवळून निघाले . त्यापैकी एका बातमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली . दुसऱ्या बातमीवर हा लेख लिहीत असताना तरी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आल्याचे  वृत्त नाही . पहिली बातमी म्हणजे  150 खाजगी रेल्वे चालवण्याचा निर्णय होय ज्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि दुसरी म्हणजे गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त तोटा रेल्वेला होण्याची बातमी . मित्रानो या  दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित बाबी आहेत . आणि त्यांची बातमी पाठोपाठ येणे हे नक्कीच काळजी करण्यासारखे आहे .  मित्रानो ,  भारतीय रेल्वे जगातील सर्वात  मोठा रोजगार देणारा सार्वजनिक उपक्रम आहे . त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने बघायलाच हवे .                          मित्रानो भारतीय रेल्वेमध्ये भारतीय तीन प्रकारे भरती होऊ शकतो . पहिल्या प्रकारामध्ये  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत होऊ शकतो केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत जी नागरी सेवा परीक्षा ( जी आपल्या महाराष्ट्रात यूपीएससीची परीक्षा म

पाउले चालती हिंदू ग्रोथ रेटकडे

इमेज
                    अमेरीकेतील एका चर्चेमध्ये राजशेखर नावाच्या अर्थतज्ञाने सन 1981मध्ये  भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात एक  कल्पना मांडली होती . जी कालांतराने हिंदू ग्रोथ रेट या नावाने प्रचलीत झाली होती . त्याकाळी भारतीय अर्थव्यवस्था सर्वसाधरण साडेतीन टक्याचा गतीने वाढत असे . त्यालाच काहिसा हस्यास्पद रितीने सांगण्यासठी त्यांनी ही संकल्पना वापरली होती . ज्यामध्ये ज्या प्रकारे धर्म बदल सहजतेने स्विकारत नाही ,  त्याच प्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था बदल स्विकारत नसल्याने ती खुप कमी गतीने वाढत असल्याचे सांगितले होते .पुढे  सन 1991च्या जूलै महिन्यात आर्थिक पातळीवर विलक्षण धक्का मिळाल्यावर यामध्ये झपाट्याने बदल झाले , आणि भारतीय अर्थव्यवस्था हिंदू ग्रोथ रेटच्या टप्यातून बाहेर येउन भारतीय अर्थव्यवस्था जगातील क्रमांक दोनची सर्वात वेगाने वढणारी अर्थव्यवस्था बनली                               .हा सर्व इतिहास येथे सांगण्याचा हेतू हा आहे की गेल्या काही दिवसापासून भारतीय अर्थव्यवस्थेची  सूरु  असलेली घसरगुंडी आता ज्या पातळीवर येऊन ठेपली आहे . ती पातळी हिंदू ग्रोथ रेट म्हणून जी पातळी सांगितली जात असे त्या