पोस्ट्स

सप्टेंबर १२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बिगुल 46व्या अमेरीकेच्या अध्यक्षाचे (भाग5)

इमेज
                          सध्या आपल्या भारतात करोना साथीच्या काळात बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यात निवडणूकीचे पडघम वाजत असताना जगातील एक क्रमांकाची महासत्ता असणाऱ्या अमेरीकेच्या 46व्या अध्यक्षासाठी 2020 नोव्हेंबर 3 रोजी होणाऱ्या निवडणूकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत एक मुद्दा भलताच गाजत आहे, तो म्हणजे पोस्टामार्फत होणारे मतदान.(माझी ही अमेरीकेच्या 46व्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणूकीसंदर्भात 5वी पोस्ट आहे . ज्यांना या आधीच्या पोस्ट वाचायचा आहेत, ते या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लिक करु शकतात )                    हा मुद्दा समजण्यासाठी आपणास काही बाबी माहिती असणे आवश्यक आहे, त्यापुढीलप्रमाणे . अमेरीकेत आपल्या भारताप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग नाहीये , त्याठिकाणी प्रत्येक राज्य स्वतंत्र्यपणे राज्यपातळीवर आणि केंद्रीय पातळीवर निवडणूका घेते .परीणामी प्रत्येक राज्याची निवडणूक घेण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी आहे. अमेरीकेत कोणत्याही निवडणूकीत सुमारे 50% मतदान होते.  हा मजकूर लिहित असताना (2020 सप्टेबर 12) जगातील सर्वात जास्त करोना रुग्ण अमेरीकेत आहेत . त्यामुळे जर एखाद्या बुथवर एकत्र जमून