पोस्ट्स

जानेवारी १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

साहित्य संमेलन आणि मी !

इमेज
      मराठी भाषा मातृभाषा असणाऱ्या आणि साहित्यावर विशेष परीणाम असणाऱ्या लोकांसाठी विशेष महत्तवाचे असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे94 वे साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे निश्चित झाले आहे. मार्च 2021मध्ये  जेव्हा  जंगलात वसंत ऋतूमुळे विविध फुले फुलली असतील तेव्हा नाशिकच्या  साहित्य पंढरीत 94 व्या साहित्य संमेलनामुळे मराठी  साहित्याला नवीन धूमारे फुटत असतील.          या साहित्य संमेलनात मराठी साहित्याचा आणि मराठी भाषेच्या विविध समस्येवर चर्चा  आयोजित केल्या जातात. जसे मराठी माध्यमांचा शाळा, वाचनालयाची स्थिती, मराठी भाषेवरील इतर भाषांचे आक्रमण वगैरे , हे आपणास  माहिती असेलच. मात्र या विविध विषयांवर होणाऱ्या चर्चेच्या दरम्यान एका महत्तवाच्या विषयावर फारसे विचारमंथन होताना आपणास दिसत नाही, तो विषय म्हणजे विज्ञान कथांचे मराठी साहित्यविश्वातील स्थान .            डाँ. जयंत नारळीकर यांनी मराठीत नावारुपाला आणलेल्या या साहित्यप्रकारात डाँ. श्रीनिवास आपटे यांनी देखील विपूल लेखन केले. मात्र डाँ. मोहन आपटे यांच्या निधनानंतर मराठी साहित्य विश्वासात हा लेखन प्रकार काहीसा मागे पडल्याचे माझे निरीक्ष