6वर्षापुर्वीची ती काळरात्र
पावसाचे दिवस होते ते . पावसाची अगदी मुसळधार बॅटिंग चालू होती . त्यामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आले होते . कोकणांत तर पाऊस आपले सर्वस्व ओतल्यासारखा पाऊस कोसळत होता . मात्र चाकरमाने याही पावसात आपले नित्य व्यवहार करतच होते . रहाटगाडगी कोणाला चुकलीये . या नित्यव्यवहाराच्या रहाटगाड्यासाठी तळकोकणातून म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून माणसे मुबईच्या दिशेने निघाले होते . काही कारणाने रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने ती माणसे आपल्या एसटी बसच्या माध्यमातून प्रवास करत होती मुंबई गोवा या म्हणायला राष्ट्रीय महामार्ग मात्र ज्याची अवस्था एखाद्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यासारखीच आहे अश्या रस्त्यावरून प्रवास करत होती . पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु असल्याने समोरचे काही फारसे दिसत नव्हते जे थोडेफार दिसत होते त्यामध्ये सर्वत्र नुसते पाणी आणि पाणीच . गाडीने तळकोकण आणि उत्तर कोकण यांच्या सीमेपर्यंत प्रवास केला ही सीमा सावित्री नावाची नदी ठरवते समुद्राच्या दिशेने तोंड उभे करून राहिले तर उजव्या हाताला रायगड जिल्हा अर्थात...