पोस्ट्स

नोव्हेंबर २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केंद्र सरकारचे स्वागतार्ह्य पाऊल

इमेज
नुकताच काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या आरोग्य खात्यामार्फत एक अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला आपल्या भारतातील वाढत्या आत्महत्या विचारत घेऊन पुढील आठ वर्षात टप्याटप्याने अमलात येणारी आत्महत्या प्रतिबंध कृती कार्यक्रम आखल्याचा तो निर्णय होता . या कृती कार्यक्रमामुळे पुढील ८ वर्षात अर्थात २०३० पर्यंत देशातील आत्महत्या १० % कमी होतील अशा विश्वास हा कार्यक्रम जाहीर करताना  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  मनसुख माडाविया  यांनी व्यक्त केला हा कार्यक्रम देशातील प्रत्येक जिल्ह्यात एकाचवेळी विविध स्तरावर राबवण्यात येणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत विविध उद्दिष्ट गाठण्यासाठी विशिष्ट कालमर्यादा घालून देण्यात आली आहे देशातील आत्महत्या रोखण्यसाठीचा देशातील हा पहिलाच कृती कार्यक्रम आहे .कोणी  कितीही मोदी विरोधक असला  तरी  मात्र या कृती कार्यक्रमाबाबत केंद्र सरकारचे अभिनंदनच करेल असाच हा कार्यक्रम आहे  या कृती कार्यक्रमानुसार पुढील तीन वर्षात लोकांचे मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी संस्थात्मक रचनेचे कार्य पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे  बंधन घालण्यात आले आहे तर जिल्हा मानसिक आरोग्य कार