पोस्ट्स

जानेवारी ९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होणार ?

इमेज
     या वर्षी भारतीय क्रिडाविश्वाचा विचार करता इतिहास घडला आहे. जगातील महत्त्वाच्या आठ बुद्धीबळपटुंचा सहभाग असलेल्या  कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूषांचा गटात तीन तर महिला गटात दोन बुद्धीबळपटू  हे भारतीय आहेत. विद्यमान विश्वविजेत्यांशी कोण लढत देणार ?हे कॅन्डिडेट् स्पर्धेद्वारे ठरते, हे लक्षात घेता,  भारतीय बुद्धिबळपटुंनी किती लक्षणीय कामगिरी केली आहे,हे लक्षात येते‌ .कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूष गटात आठ खेळाडू असतात या वर्षी या आठ खेळाडूंपैकी 3 म्हणजे 37.5 टक्के तर महिला गटात आठ खेळाडूंपैकी 2म्हणजे 25टक्के खेळाडू भारतीय आहेत.जगात सुमारे 190 देशात बुद्धीबळ खेळले जाते.त्याचा विचार करता आपल्या बुद्धिबळपटुंनी किती उत्तम कामगिरी केली आहे.हे लक्षात येते. वरील आकडेवारी बघता या वर्षी कोणता तरी भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होण्याची दाट शक्यता वाटते.ही अव्वल कामगिरी करणारे पुरुष बुद्धीबळपटु आहेत नाशिकचे सुपुत्र सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी, माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यांना एकाच वर्षात दोनदा हरवण्याचा पराक्रम करणारे ग्रँडमास्टर आर.प्रज्ञानंद , आणि ग्रँडमास्टर डी गुकेश तर महिला गटात ग्रँडमास्टर

ग्रामीण जीवनाची अनुभुती देणारे पुस्तक "दिसामाजी"*

इमेज
कोव्हिड 19च्या साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेकांनी या अनाहुतपणे मिळालेल्या या सुट्टीचा वेगवेगळा वापर केल्याचे आपणास आठवत असेलच. बहुसंख्य लोकांनी विविध आरोग्य विषयक उपचार करत यामध्ये स्वतः ला कोरोनापासून दूर ठेवले काही लोकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करत अनेक नवीन कला शिकून घेतल्या. काही जणांनी त्यांची करू करु असे म्हणत अनेक दिवस करायची राहुन गेलेली कामे या काळात केली. तर मुळचे कवी असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत भरवीरकर यांनी या सुट्टीचा वापर करत, समर्थ रामदास स्वामी यांची "दिसामजी काहीतरी लिहावे" ही शिकवण अंगी बाणवत ,  लेखन केले.कोणतेही लेखन जर पुस्तकरूपाने  प्रसिद्ध झाले तर ते चिरतरूण होते,हे माहिती असल्याने पुढे त्यांनी त्यांचे पुस्तक केले.ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित "दिसामजी" हेच ते पुस्तक. जे मी नुकतेच वाचले.     प्रशांत भरवीरकर यांचे सुरुवातीचे आयुष्य निफाड तालुक्यात गेले असल्याने, या लेखनाला ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी आहे.  सदर पुस्तकात ललितपर असे 45लेख आहेत. लेखांची भाषा आत्मपर आहे. सहज ओघवती असल्याने लेख कुठेही कंटाळवाणे झालेले