पोस्ट्स

जुलै २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण या बदलांना तयार आहोत का?

इमेज
   सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर नजर टाकली असता,  मुंबईत आणि तळ कोकणात ( रत्नागिरी सिंधूदुर्ग जिल्हे) पावसामुळे झालेले नुकसान , आणि आगामी पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने दिलेले विविध इशारे यांच्या बातम्या आपणास दिसतात. या सर्व बातम्यांचा गदारोळात या प्रश्नाच्या मुळाशी जाणारी एक बातमी पुण्याहुन आली, ती आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो पुण्याचा पाषाण या उपनगरातील  डाँ होमी भाभा रोडवरील IITM( Indian Institute for   Tropical Metrology )या संस्थेमार्फत  अरबी समुद्राविषयी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात सन 1982 ते 2002 या कालखंडापेक्षा 2001ते 2019 या कालखंडात 52% अधिक संख्येने चक्रीवादळे अरबी समुद्रात आल्याची तसेच त्यांची तीव्रता वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच याच कालावधीत बंगालच्या उफसागरात 8% कमी चक्रीवादळे आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.  सर्वसाधरणपणे अरबी समुद्रात वर्षभरात एक किंवा फार तर दोन चक्रीवादळे तयार होत. अरबी समुद्रात दोन पेक्षा जास्त चक्रीवादळे म्हणजे डोक्यावरुन पाणी असी स्थिती असे. तर बंगालच्या उपसागरासाठी 3ते4चक्रीवादळे ही