पोस्ट्स

जुलै २३, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जो बायडेन यांच्या माघारीचे कवित्व !

इमेज
सोमवार २२ जूलैची सकाळ भारतीयांसाठी मोठ्या धक्क्याची ठरली. डेमोक्रेटीक पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन यांनी गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पक्षांतर्गत विरोध, आणि सध्या झालेल्या कोव्हिड १९मुळे निर्माण झालेल्या प्रकृती अस्वाथामुळे हार मानत आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडत आहे. आपला पाठिंबा विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना असल्याचे जाहिर केले, आणि जगभर एकच खळबळ उडाली. तसा हा निर्णय अनेकांना अपेक्षीतच होता. नाटो परिषदेच्या अधिवेशनाच्या वेळी युक्रेनचे राष्ट्रपती झेलंस्की यांचा उल्लेख पुतीन असा करणे, स्वत:च्या प्रचारादरम्यान उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांंचा ऐवजी ट्रम्प असे उच्चारणे, अनेक चर्चासत्रांमध्ये मध्येच पेंगणे, बोलताना वारंवार अडखळणे‌, सभांमध्ये बोलताना मध्येच काही गरज नसताना मोठा पॉज घेणे. ज आदी काहीसी वृद्धवाची लक्षणे मोठ्या संख्येने दाखवणे, तसेच वयाची ८१वर्ष पुर्ण असणे आदी गोष्टींमुळे त्यांचा उमेदवारीला डेमोक्रेटीक पक्षातूनच मोठा विरोध होत होता.त्यातच आता जगभरातून जवळपास संपलेला कोव्हिड १९ संसर्ग त्यांन