पोस्ट्स

एप्रिल २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लंकेचे पुन्हा दहन

इमेज
       रामायणात भगवान हनुमानाने लंका जाळल्याचा उल्लेख आहे. श्रीलंकेला भेट देणारे पर्यटक या जळलेल्या श्रीलंकेचे अवशेष देखील बघतात. श्रीलंकेस भेट देणाऱ्या पर्यटकांना अशोकवाटीकेचे अवशेष देखील दाखवतात.रावणाची ही लंका जाळण्यात आली,त्रेतायुगात .सध्या कलीयुग सुरु आहे. मात्र आज  2022 मध्ये सुद्धा श्रीलंका जळत आहे.दुसऱ्यांंदा श्रीलंका जाळण्यासाठी बाहेरुन कोणी आलेले नाही. श्रीलंकेचे स्वतःचे लोक श्रीलंका जाळत आहे. श्रीलंकन सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे आलेल्या आर्थिक विपन्नतेच्या त्रागातून श्रीलंकेतील नागरीक स्वतः च्याच देश जाळत आहे.  रम्य ही स्वर्गाहुन लंका असे एकेकाळी म्हटले जाणारी श्रीलंका आज खरोखरीच लंकेची पार्वती झाली आहे. जे तेथून येणाऱ्या बातमीतून दिसत आहे.  श्रीलंकेची राजधानी कोलोंबोत सरकारविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलकांनी हिंसक स्वरूप घेतले आहे. 31मार्चला कोलोंबोतील नागरीकांनी राष्ट्राध्यक्षांचा खासगी घरात घुसण्याचा प्रयत्न केला .ज्यामुळे सुरक्षा रक्षक आणि नागरीकांमध्ये दंगा झाला,ज्यात 2 जण गंभीर झखमी झाले.संतप्त नागरीकांनी सुरक्षा रक्षकांंचा दोन बसेस, एक अँटोरीक्षा आणि एक दुचाकी पेटवून द