पोस्ट्स

नोव्हेंबर २४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वे चित्याचा वेगाने बदलाकडे

इमेज
150 वर्षापेक्षा अधिक इतिहास असणारी आपली भारतीय रेल्वे सध्या चित्याचा वेगाने बदलत आहे. याची साक्ष पटवणाऱ्या दोन घडामोडी गेल्या पंधरवाड्यात घडल्या. पारंपारीक माध्यमांनी याची यथोचित दखल न घेतल्याने त्या आपणास सांगण्यासाठी आजचे लेखन. तर भारतीय रेल्वेत रेल्वेगाड्या ओढण्यासाठी विविध प्रकारच्या रेल्वे इंजिनाचा वापर करण्यात येतो, हे आपणास ज्ञात असेलच. जसे WDM 3D, WAP4, WAG 9H, WAP7 वगैरे. ते इंजिन कस्यासाठी वापरायचे?(प्रवाशी गाड्या ओढण्यासाठी, मालवाहतूकीच्या गाड्या ओढण्यासाठी किंवा दोन्ही प्रकारच्या गाड्या ओढण्यासाठी) ते इंजिन कोणत्या प्रकारच्या उर्जेचा वापर करून चालवायचे?(जसे विद्युतप्रवाहावर, डिझेलचा वापर करुन)  अथवा ते रेल्वे इंजीन कोणत्या प्रकारच्या रेल्वेमार्गावर चालवायचे (नँरोगेज , मीटरगेज की ब्राँडगेजवर) यावरुन हे प्रकार पडतात, हे ही आपणास माहिती आहे.  तर मित्रांनो , भारतीय रेल्वेत गेल्या पंधरवाड्यात घडलेल्या दोन घडामोडींपैकी एक घडामोड याच रेल्वे इंजिनाबाबत आहे. भारतीय रेल्वे सध्या डायरेक्ट करंट (डिसी) ट्रँक्शन मोटरवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनाचे उत्पादन करणे बंद करत आहे. त्याच मालिकेत WAP