पोस्ट्स

जुलै १८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चेन्नइ , मराठवाडा , भविष्याची चाहुल देणारे ठिकाणे

इमेज
               आज हा मजकूर लिहित असताना, भारतातील आसाम, बिहार , आदी राज्यात पावसाने कहर केला  आहे , मात्र याच भारतातील मराठवाडा हा विभाग आणि चेन्नई या शहरात पाण्यासाठी वणवण करायची वेळ आलीये       आजमितीस मराठवाड्यात अत्यंत कमी पाणी आहे .तर चेन्नई शहरात रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आलीये . काही जण चेन्नई शहरातील पाण्याचा आणीबाणीला कर्नाटक बरोबर तामिळनाडू या राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सुरु असणाऱ्या वादाला जवाबदार धरतील . मात्र हा वाद  पाण्याचा अनुपलब्धतेमुळेच हा वाद  सुरु झालायं, हे मात्र नाकारुन चालणार नाही . मराठवाड्यात त्याचा भौगोलिक स्थानामुळे अत्यंत कमी पाउस पडतो . त्यातही जो काही पाऊस पडतो तो जमीन जांभ्या खडकांची असल्याने पाणी फारसे जमिनीत मुरत नाही . परिणामि दर एक दोन वर्षानंतर मराठवाड्यावर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येते . सध्याच्या बदलत्या हवामानाचा काळात  पावसाचा लहरीपणा वाढल्याने यामध्ये भरच पडत आहे . आत्यंतिक राज्यनिष्ठा असलेल्या कर्नाटक आणि तामिळनाडूचा प्रशा काही औरच आहे . या मुद्यावर या दोन राज्यामध्ये कित्येकदा चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत .