पोस्ट्स

ऑगस्ट १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताच्या आसपासचे आर्थिक अरिष्टय

इमेज
         आपल्या भारताभोवती असणाऱ्या  नउ देशांपैकी पाच देशांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. सभोवतालच्या देशांची गंभीर आर्थिक स्थिती भारतासाठी सुद्धा फारसी सुखावणारी नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका हे ते देश. यातील श्रीलंकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत अवघड जवळपास अशक्यप्राय स्थितीत पोहोचल्याचे आपणास माहिती आहेच. तेथील माजी पंतप्रधान आणि विद्यमान राष्टपती रणिला विक्रमसिघे यांनी पंतप्रधान पदावर कार्यरत असताना तेथील संसदेत श्रीलंका दिवाळखोर झाल्याचे जाहिर सुद्धा केले होते.त्यामुळे श्रीलंका आणि अफगाणिस्तान मधील आर्थिक स्थिती चिंताजनक असली तरी पाकिस्तानने अनधिकृत ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमुळे त्यांचा आर्थिक विपन्नतेचा भारतावर काहीसा कमी परीणाम होइल म्हणून अफगाणिस्तानचा देखील अपवाद केला तरी पाकिस्तान नेपाळ बांगलादेश मधील आर्थिक आरीष्ठ भारतापुढे मोठी डोकेदुखी ठरु शकते.         पाकिस्तान नेपाळ, बांगलादेश हे देश परकीय चलनाचा कमी साठ्याचा समस्येशी झूंजत आहेत. देशातील परकीय चलनाचा साठा कमी होवू नये, म्हणून नेपाळने आवश्यक त्याच गोष्टींची आयात करण्याचे धोरण अमंलात आ