पोस्ट्स

सप्टेंबर १८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कांदा निर्यात बंदीचे जागतिक पडसाद

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चिला जाणाऱ्या मुद्यामध्ये कांदा निर्यात बंदीचा विषय हा प्रमुख मुद्दा आहे . केंद्र सरकारकडून लादल्या गेलेल्या कांदा निर्यात बंदीचे जागतिक पडसाद आता उमटत आहे .  याबाबत मराठी वृत्तवाहिनीवर फारशी माहिती देण्यात न आल्याने त्या विषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन . ही माहिती द प्रिंट आणि व्हियॉन या माध्यमातून घेतलेली आहे . त्याचा लिंक या लेखाच्या खाली पोस्ट केल्या आहेत जिज्ञासू त्या भागू शकतात . तर मित्रानो ज्या बांगलादेशाबरोबर ईशान्य भारताच्या विकासासाठी भारताचे अनेक प्रकल्प सुरु आहेत त्या बांग्लादेशाबरोबर कांदा या पिकावरून भारताचे संबंध काहीसे तणावपूर्ण बनले आहेत . भारतीय कांद्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील  सर्वात मोठा ग्राहक  हा बांगलादेश आहे . हे पण लक्षात घेयला हवे , तर बुधवार दिनांक 2020 सप्टेंबर 16रोजी  बांगलादेशचे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शह्ररिअर आलम (Shahriar Alam )  यांनी तीव्र शब्दात या बंदीबाबत नापसंती दाखवली .बांगलादेशने या आधीच तुर्कस्तान आणि इजिप्त या देशातून कांदा आयात करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे  ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्या