पोस्ट्स

जानेवारी २७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुर्व चिनी समुद्र आणि मेकाँग नदी वादाची नवी ठिणगी

इमेज
                गेल्या आठवड्याभरात चीन हा मुद्दा भारतीय माध्यमांमध्ये विशेषत्वाने चर्चिला गेला. या मुद्द्यांची चर्चा करताना भारतीय माध्यमांमध्ये भारत चीन सीमावादाबाबतच बोलले गेले. मात्र भारतीय माध्यमे चीनबाबतच्या सीमावादाबाबत वार्तांकन करत असताना चीनबरोबर इंडो चायना भागातील देशांचा (आग्नेय आशिया )मेगाँक या नदीवरुन वाद सुरू होता. चीनच्या जलविद्यूत प्रकल्पामुळे मेगाँक नदीतील पाण्याचा प्रवाह  अचानक सुमारे 50%कमी झाल्याने या देशांनी चीनबाबत नाराजी व्यक्त केली. याबरोबर चीनने भारताबरोबर सीमा वाद उकरुन काढत असताना तैवान (अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना, अर्थात आर ओ सी ){अधिक माहितीसाठी आपण ज्याला चीन म्हणतो त्याचे अधिकृत नाव पिपल्स रिपब्लिक आँफ चायना अर्थात पि आर सी आहे} या देशाच्या हवाई हद्दीत क्षेपणास्त्र वाहुन नेणारी विमाने पंधरा विमानाच्या गटाने दोनदा दाखल करुन आपण काय करु शकतो, याची जगाला झलक दाखवली. दुर्देवाने आपल्या भारतीय माध्यमांमध्ये या विषयी फारसे बोलण्यात आले नाही. मला सिंगापूर सरकारची मालकी असणाऱ्या चँनेल न्युज एशिया या वृत्तवाहिनीमध्ये याविषयक बातमी दिसली. ती आपणापर्यत पोहोचवण्यास