पोस्ट्स

सप्टेंबर २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन महान समाजसुधारकाला

इमेज
1932 सप्टेंबर 29 ही फक्त एक तारीख नाहीये.ही तारीख आहे, आज 2022 साली सुद्धा ज्या समाजात कट्टरतेचा प्रचंड विळखा आहे, ज्या समाजातील कट्टरतेविषयी कर्नाटक, केरळ या भारतातील राज्याबरोबर इराण सारख्या देशातून सुद्धा बातम्या येत असतात, अस्या इस्लामधर्मातील जे एका हाताच्या बोटावर मोजता येतील अस्या समाज सुधारकांपैकी एक आहेत असे ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई यांची जन्मतारीख .आज 2022साली त्यांची 90वी जयंती. या निमित्ताने त्यांना भावपुर्ण आदरांजली. 1932 सप्टेंबर 29 ते 1979 मे 3 हा त्यांचा कालखंड .त्यांचे निधन 1979साली झाले लक्षात घेता त्यांनी किती कठीण काळात इस्लाम धर्मियांमध्ये सुधारणेसाठी प्रयत्न केले हे लक्षात येते.आज 2022साली विविध ठिकाणी पोशाखावरुन होणाऱ्या आंदोलनाच्या बातम्या विचारात घेता ,आजपासून सुमारे 50 वर्षापूर्वी स्थिती किती भयावह असेल याची कल्पनाच केलेली बरी.अस्या काळात ही व्यक्ती समाज सुधारणेसाठी झटत होती. राष्ट्र सेवा दल या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी झटत होता.महिलांच्या प्रश्नांबाबत जनजागृती करत होती समाजातील अंधश्रद्धेवर आसूड ओढत होती समाजाला आधुनिक मुल्ये शिकवण्याचा