पोस्ट्स

जानेवारी १५, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अशांत राजकीय वादळाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान

इमेज
                     सध्या पाकिस्तानातील घडामोडी बघितल्यास या सर्व घडामोडींचे वर्णन अशांत राजकीय वादळाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान  असेच करावे लागेल एकीकडे रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसासाठी सर्वसामान्य जनता  झगडत असताना पाकिस्तानमधील राजकारणी मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झोडण्यात व्यस्त आहेत . रविवार १५ जानेवारीला सिंध प्रांतातील विविध महानगरपालिका  नगरपालिकांसाठी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत इम्रान खान त्यांच्या पाकिस्तन तेहरीके इन्साफ या पक्षाला मिळालेल्या अनपेक्षित धक्याने गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या राजकारणाच्या चिखलफेकीला मोठ्या प्रमाणत  उत्तेजन मिळाले आहे . सिंध प्रांतात १५ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत अत्यंत कमी मतदान झाले . अल जझीरा या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार रविवारी दुपारपर्यंत अनेक मतदान बूथपर्यंत जेमतेम १० ते १५ नागरिकांनी मतदान केले होते . याच वृत्तवाहिनीने दिलेल्या दुसऱ्या बातमीनुसार सिंधमध्ये झालेल्या निवडणुकीत प्रांतात सत्ताधिकारी असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी ने राक्षसी वाटावे असे बहुमत मिळवले आ

लासलगावची बखर -

इमेज
जगातील प्रत्येक शहराला इतिहास असतो . मात्र फारच कमी शहरांचा इतिहासाची पद्धतशीरपणे नोंद ठेवली जाते पाश्चात्य देशापेक्षा आपल्या भारतात तर हे प्रमाण खूपच ढासळते . मात्र सध्या या चित्रात सकारत्मक   बदल होत आहे   पूर्वी न लिहल्या गेलेला अनेक शहरांच्या इतिहास त्या शहरातील महत्वाच्या व्यक्ती ता शहरातील महत्वाच्या संस्था त्यांच्या इतिहास याच्या जाणीपूर्वक नोंदी ठेवण्याचे काम सध्या अत्यंत वेगाने होत आहे या नव्या   मोहिमेत फक्त महानगरांचाच इतिहास लिहला जात नाहीय्ये तर अगदी तालुक्यस्तरवरील किंवा एखद्या तालुक्याचे मुख्यालय नसणाऱ्या मात्र त्या तालुक्यतातील   महत्त्वाची बाजरपेठ असणाऱ्या गावांचा देखील समावेश होत आहे याच मालिकेतील एक गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यतील लासलगाव . कांद्याचा उत्पनासाठी   सर्व जगभरात प्रसिद्ध असलेल्या या लासलगावच्या इतिहासाला पुस्तकात शब्दबद्ध केले आहे लासलगावचेच   रहिवाशी असणाऱ्या संजय बिरार   यांनी .  लासलगावची बखर असे नाव असलेले आणि   पुणे आणि नाशिक येथे आपले कार्