पोस्ट्स

फेब्रुवारी २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीलंकेचा पाय खोलात

इमेज
        आजमितीस  काही मोजक्या वृत्तवाहिन्यांच्या अपवाद वगळता सर्व भारतीय वृत्तवाहिन्या रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाबाबत बॉलिवूडचा चित्रपट वाटावा अश्या पद्धतीने वार्तांकन करत असताना,  आपल्या भारतापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या  निसर्गाचे अभूतपूर्व देणे लाभलेल्या आणि ज्याच्या सरकारच्या रेडिओवरून वाजवण्यात येणाऱ्या हिंदी चित्रपट गीतांनी एकेकाळी समस्त भारताला वेड लावले होते अशा श्रीलंका आर्थिकदृष्टया प्रचंड अडचणीत आला आहे .  बुधवार २३ फेब्रुवारी रोजी  देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला अजून घसरण्यास हातभार लागावी  अशी घडामोड  घडली.  कोलोंबो शेअर बाजार पहिल्यांदा  ५  टक्कयांनी आणि  नंतर साडे सात टक्क्यांनी  असे दोनदा घसरल्याने  दोन्ही वेळेस कोलोंबो शेअर मार्केटमध्ये लोवर सर्किट लावावे लागावे होते जेव्हा शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात घसरतो,  तेव्हा गुंतवूणूकदारांचे अजून नुकसान होऊ नये , यासाठी काही काळ शेअर बाजरातील व्यवहार बंद ठेवले जातात त्यास लोवर सर्किट म्हणतात.  ही बाब लक्षात घेता,  या गोष्टीचे गांभीर्य लक्षात येते . एकीकडे पुरेसे परकीय चलनाचा साठा नसल्याने आधीच प्रच

ज्ञानभाषा मराठी!

इमेज
    फेब्रुवारी महिन्याचा शेवटून दुसरा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हे जगजाहीर आहे. मराठीतील थोर कवी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत साजरा होणाऱ्या, या दिवशी समाजमाध्यमांमध्ये मराठीची थोरवी गाणाऱ्या, तीला अभिजात भाषेचा दर्जा का आवश्यक आहे ? तसेच मराठी कशी जगातील एक प्रमुख भाषा आहे, मराठी माध्यमातील शाळा टिकवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?   मराठी वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे. हे सांगणाऱ्याविविध पोस्ट आपण दरवर्षी  बघतो .आता मी मराठीतच बोलणार, लिहणार असा संकल्प देखील आपल्यापैकी अनेक जण या निमित्ताने करतात. मात्र दरवर्षी मराठीबाबत ठराविक गोष्टींचीच उजळणी होते,मात्र घोडे काही पुढे जात नाही, असो     ब्रिटीश लोक तंत्रज्ञानात पुढे होते. ज्यामुळे त्यांनी भारतासह जगभरातील विविध सत्ताधिशांचा पराभव केला, आणि संख्येने कमी असून देखील ते तेथील सत्ताधीश झाले. सत्ताधिशांची भाषा म्हणून इंग्रजी जगभर पसरली, परीणामी आज ती जगातील एक सर्वत्र बोलली जाणारी भाषा म्हणून उदयास आली आहे. आपली मराठी नेमकी मार खाते ती इथेच. सर्वसामन्यांना समजेल अस्या मराठीत मोठ्या प्रमाणावर ज्ञान उपल