पोस्ट्स

जून १४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय माध्यमे आणि शांघाय कोऑपरेशन

इमेज
            सध्या किरिगिस्ता न या देशात " शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन' या जागतिक संघटनेचे अधिवेशन चालू आहे . आपल्या देशाचे पंतप्रधान मा . नरेंद्र  मोदी या अधिवेशनाला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत . या जागतिक अधिवेशनात विविध जागतिक मुद्यांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये संघटनेच्या  सदस्य देशांमध्ये आर्थिक , व्यापारी सामाजिक, सांस्कृतिक , प्रादेशिक शांतता , शास्त्र विषयक  घडामोडी ,बदलते पर्यावरण  राजकीय घडामोडी   आदी घडामोंडीचा समावेश असणार आहे . त्यासाठी विविध देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहे . ज्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुद्धा असणार आहेत . कोणत्याही जागतिक अधिवेशनात काही द्विस्तरीय पातळीवर चर्चा होतच असतात . त्याच न्यायला अनुसरून भारताचे पंतप्रधान  नरेंद मोदी यांचा  काही राष्टांच्या प्रमुखांशी  चर्चा होणार आहेत . ज्यामध्ये प्रामुख्याने चीन या राष्टाशी आपले नरेंद्र मोदी चर्चा करत आहेत .               मात्र भारतातील प्रादेशिक भाषेतील  माध्यमांकडून या अधिवेशनाचे वार्तांकन करताना या अधिवेशनात चर्चिला जाणाऱ्या बाबीं