पोस्ट्स

मार्च १३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

या सारखे बदल आपल्या एसटीत कधी होईल ?

इमेज
       मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एसटी संदर्भात तीन बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या त्यातील एक गोष्ट महाराष्ट्राच्या एसटी संदर्भात होती तर दोन बातम्या कर्नाटकच्या एसटी संदर्भात होत्या .महाराष्ट्राच्या एसटी संदर्भातील  बातमी विषयी आता पर्यंत बरेच बोलणे गेले आहे त्यामुळे मी त्यावर बोलणार आंही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते कर्नाटकाच्या एसटी संदर्भात प्रसार माध्यमामध्ये आलेल्या बातम्यांविषयी .. या बातम्या समजून घेण्याच्या आधी आपणास कर्नाटक एसटीची रचना कशी आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे   तर मित्रानो , सध्या आपल्या महाराष्ट्राच्या एसटीला ज्या समस्या भेडसावत आहे त्या प्रकारच्या समस्या काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या एसटीला देखील जजाणवत होत्या . या समस्येला तोंड देण्यासाठी कर्नाटकाच्या एकछत्री एसटीचे विभागवार विभाजन करत नॉर्थ वेस्ट कर्नाटक एसटी नॉर्थ ईस्ट कर्नाटक एसटी , कर्नाटक एसटी , बंगलोर कर्नाटक एसटी आदी एसटी महामंडळाची निर्मिती केली . त्यानंतर या विभागाची कर्नाटक राज्यांतर्गत स्पर्धा घेत त्याद्वारे आपला दर्जा वाढवला आजमितीस संपूर्ण भारतात कर्नाटकाची एसटी देशभरात अव्वल स्थानी आहे