पोस्ट्स

एप्रिल २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन (भाग7)

इमेज
  आपल्याकडे कोरोनामुळे स्थिती अत्यंत चिंताजनक असताना आपल्या भारताचे शत्रू राष्ट्र चीन याबाबत तीन घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्या. शत्रूवर कायम लक्ष असणे आवश्यक आहे. या चाणक्य नितीनूसार चीनबाबत घडलेल्या तीन्ही बाबी आपणांस सांगण्यासाठी आजचे लेखन. तर मित्रांनो, गुरुवारी दूपारी क्येटा शहरातील चीन वकिलातीजवळ असणाऱ्या हाँटेलमध्ये स्फोट झाला. सुदैवाने त्यावेळेस काही कामानिमित्त चीनी अधिकारी दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे या स्फोटातून वाचले.क्येटा  पाकिस्तानातील बलूचीस्थान प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. सध्या चीन पाकिस्तान इकाँनाँमिक काँरीडर अंतर्गत बलूचीस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. ज्यास स्थानिक जनतेचा विरोध आहे. या विकासकामांमुळे बलूचीस्थानचा फायदा होण्याऐवजी शोषणच होईल.असी स्थानिकांची भुमिका आहे. ते सातत्याने आपला विरोध दर्शवत असतात. या आधी पाकिस्तान अमेरीका यांच्यात घनिष्ठ मैत्री असताना दोनदा पाकिस्तानातील अमेरीकी दुतावासावर हल्ला झाला होता. तहरीके ए तालीबान यांनी या हल्ल्याची जवाबदारी स्विकारली आहे. तहरीके पाकिस्तानची भुमिका पाकिस्तानात शारीया कायदा लागू करावी, असी आहे. त

जागतिक पुस्तक दिन विशेष !

इमेज
आज 23 एप्रिल अर्थात  जागतिक पुस्तक दिन, त्यानिमित्ताने सर्व पुस्तक प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणि पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा      आजकाल पुस्तकाची परीभाषा अनेकार्थाने बदललली आहे. आता आता पर्यत मराठी भाषेत न आढळणारा आँडिओ बूक हा प्रकार आता मराठीत चांगलाच रुळला आहे.अनेक अँप त्यासाठी वापरली जात आहे.येत्या काही दिवसात प्रिंट आँन डिमांड मुळे पारंपारीक पुस्तकाची दूकानांचे स्वरुप पुर्णतः बदलून जाईल, मात्र पुस्तकाचे महत्व कमी होणे अशक्य. मध्यंतरी समाजमाध्यमांवर बराच रुळलेला मात्र कायदेशीर नसणारा प्रकार म्हणजे पुस्तकाचा पिडीएफ फाईल, हे सुद्धा पुस्तकाचे एक  साधनच म्हणता येवू शकते. माझ्या माहितीत असे दोन नियतकालीके आहेत, जी मला खुद्द प्रकाशकाकडूनच व्हाँटसप मार्फतच येतात, असो. किंडल सारख्या पुस्तकां विषयीच्या गँझेटमुळे वाचताना आपल्या डोळ्याला सोइस्कर होईल, असा प्रकाश ठेवता येतो, तसेच वाचताना एखाद्या शद्बाचा अर्थ माहिती नसल्यास त्याचा अर्थ देखील समजू