पाकिस्तानमधील राजकीय.सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा मागोवा घेणारे पुस्तक, 'कुंपणापलीकडला देश पाकिस्तान'
आपल्याकडे पाकिस्तानचे नाव निघाल्याबरोबर सर्वसाधारतः वैरभावना जागृत होते आता काश्मीरमध्ये दहशदवादी कारवाया होत नसल्या तरी, या आधी काश्मीर मुद्यावरून झालेली तीन युद्धे बघता, ती बरोबरच म्हणता येईल . मात्र ही युद्धे तेथील राजकारणी आणि लष्करशाहीने भारतावर लादलेली होती तेथील जनसामान्यांनी भारताबरोबर केलेली युद्धे नव्हती ती. राजशात्राचा विचार करता, सर्वसामान्य जनता आणि शासनकर्ते या दोन्ही एकमेकांना पूरक मात्र एकमेकांपासून पूर्णतः वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे त्यांची सरमिसळ करत शासनकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांची मते एकच आहेत असे समजणे चुकीचे आहे, एकेकाळी एकाच देशाचा भाग असलेल्या आणि आपल्या भारतात काही वर्षापर्यत दहशतवादी कारवाया करणाऱ्या आपल्या शेजारी देशाची मोठ्या प्रमाणात माहिती असणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक ठरते आपणस माध्यमात येणाऱ्या बातम्यांद्वारे तेथील शासनकर्त्यांची मते समजतात मात्र सर्वसामान्य जनतेची मते समजत नाहीत त्याम...