पोस्ट्स

फेब्रुवारी ४, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आर्थिक वर्ष २०२3-२४ च्या अर्थसंकल्पात रेल्वेचा विचार करता महाराष्ट्राला काय मिळाले ?

इमेज
                नुकताच आपल्या भारताचा आर्थिक वर्ष २०२ 3- २४   चा अर्थसंकल्पात जाहीर झाला .  सन २०१६ साली १९२३ पासून सुरु असणारी प्रक्रिया खंडित झाली आणि रेल्वे अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला , ज्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात होणाऱ्या विविध घोषणा थांबल्या .  ज्यामध्ये येणाऱ्या वर्षात सुरु होणाऱ्या प्रवाशी रेल्वेगाड्या , रेल्वेतर्फे होणारे विविध विकासकामे जसे नव्या मार्गाची निर्मिती , अस्तित्वात असणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण तिहेरीकरण   , गेज बदलणे , डिझेल मार्गाचे विद्युतीकरण वगैरे . आज ज्या प्रमाणे पूर्वी   इतर मंत्रालयाच्याबाबत   तरतुदी घोषित केल्या जात   असत त्याच प्रमाणे रेल्वेबाबतच्या तरतुदी घोषित केल्या जातात .  मात्र त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किती खर्च आला या विषयी सविस्तर माहिती अर्थसंकल्पाच्यावेळी मिळत नाही रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर काही दिवसानी   याबाबत विभागनिहाय माहिती प्रसिद्ध करण्यात येते जसे की मध्य रेल्वेच्या अंतर्गत पुढील कामांसाठी