पोस्ट्स

नोव्हेंबर १६, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचे परसदार आणि भारत

इमेज
                      सध्या भारताच्या शेजारील देशांचे भारतासी असणारे सबंध अत्यंत नव्या वळणावर आहेत. बांगलादेश , म्यानमार,  भूतान, मालदिव, श्रीलंका आदी सर्वच देशांशी भारत नव्याने मैत्री विकसीत करत असल्याचे आपणास माहिती असेलच. यातील बांगलादेश आणि म्यानमार यांच्या बरोबरच्या भारताच्या मैत्रीसंबधी मी या आधीच लिहले आहेत. या लेखाच्या शेवटी त्या लेखाच्या लिंक दिलेल्या आहेत . जिज्ञासू त्या बघू शकतात. यावेळेस मी बोलणार आहे. मालदिव या राष्ट्राबरोबर असलेल्या भारताच्या मैत्रीबाबत.(भारताच्या मालदिव बरोबर असणाऱ्या मैत्री बाबत मी या आधी लिहले होते, ज्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)                           भारताची मालदिव बरोबर असणारी मैत्री नव्याने चर्चेत आली, ती 3 नोव्हेंबर 2020 रोजी असणाऱ्या मालदिवच्या व्हिटरी डे कार्यक्रमात मालदिवच्या राष्ट्रप्रमुख असणाऱ्या इब्राहिम मोहमद सोली यांनी  केलेल्या विधानामुळे. सन 1988 च्या 3नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेच्या एका मासेमारी करणाऱ्या नौकेने मालदिववर सशस्त्र हल्ला केला. त्यावेळेस भारताच्या नौदलाने त्याचा प्रतिकार करत त्यांंना धूळ चारली होती. म्हणून मालदिवच

एक कटू वास्तव

इमेज
                            मी दिवाळीच्या दिवसातील मोकळ्या वेळात आपल्या हिंदीतील एक प्रतिभावंत सिने निर्माते दिग्दर्शक जे वास्तवदर्शी चित्रपट तयार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचा अर्थात मधूर भांडारकर यांचा "जेल" हा चित्रपट बघीतला. चित्रपटाचे कथानक एका चांगल्या घरातील व्यक्तीला फसवणून तरुंगवारी घडवण्यावर आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेदिग्दर्शक, निर्मात्याने आपणास तूरुंगातील वास्तव समोर मांडले आहे. ज्यांंना ते गुन्ह्यात दोषी ठरले असते तर जेव्हढी शिक्षा झाली असती, त्याचा कित्येक पट अधिक कालावधी संशयीत म्हणून तूरुंगात कोणत्या प्रकरे काढावा लागतो? पुरेसे पैसे नसल्याने जामिनाला पात्र असूनदेखील अनेक निपराधी तरुंगाचा भिंतीत कसे खितपत पडतात याचे दाहक वास्तव या चित्रपटातून दाखवले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने तो बघावाच, असे मी म्हणेल. तसेही मधूर भांडारकर यांचे सर्वच चित्रपट उत्तमच आहेत, चांदणी बार , मै माधूरी दिक्षीत बनना चाहती हूं, पेज थ्री, कापोरेट, ट्रँफिक सिग्नल. मात्र जेल हा चित्रपट अंगावर अक्षरशः  अत्यंत शहारे आणतो .               नुकत्याच एका पत्रकाराला झालेल्या अटक आण