पोस्ट्स

नोव्हेंबर १४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपल्या शेजारी हे घडत आहे.

इमेज
आपल्या मराठी वृत्तवाहिन्या विविध ख्यातनाम लोकांच्या घराची दिवाळी दाखवत असताना आपल्या भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तानातील गिलगीट बाल्टीस्तान या भागात रविवार 15नोव्हेंबरला विधीमंडळाच्या निवडणूका होत आहे.  गेल्या काही दिवसांपर्यत प्रशासकीय रचनेनूसार हा प्रदेश केंद्राच्या नियंत्रणाखालील प्रदेश होता (गेल्या काही वर्षापर्यत  पाकिस्तानात केंद्राच्या नियंत्रणात दोन भाग होते. एक हा ज्याला आता आतापर्यत फेडरली अँडमिस्टेटीव्ह नाँर्दन एरीया {संक्षिप्तरुप फाना } म्हणत तर दुसरा म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरचा फेडरली अँडमिस्टेटीव्ह ट्रायबल एरीया {संक्षिप्तरुप फाटा } हा होता, जो काही वर्षापुर्वी खैबर ए पश्तूनवा{वायव्य सरहद्द प्रांत} यात विलीन केला) त्याला पाकिस्तानी संसदेने प्रांत {प्रांत आणि राज्य यात राजशास्त्रादृष्ट्या काही फरक आहेत. प्रांताला राज्याचा तूलनेत कायदेशी अधीकार कमी असतात. मात्र रचना 90ते95% सारखीच असते)म्हणून मान्यता दिल्यावर पहिल्यांंदा या निवडणूका होत आहेत. तेथील प्रांतीय विधीमंडळाची एकूण सदस्य संख्या 33आहे , त्यापैकी 9सदस्य केंद्रातून नियुक्त केले जातात तर 24सदस्य तेथील

लक्ष्मी पुजन विशेष

इमेज
आज दिवाळीचा   तिसरा दिवस . दिवाळीचा पाच दिवसांपैकी सर्वात महत्तवाचा दिवस अर्थात लक्ष्मी पुजन . या दिवशी आबालवृद्ध   धनाची देवी अर्थात लक्ष्मीची पुजा करतात . या   दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके उडवून आनंद साजरा करण्याची प्रथा आहे . सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे ; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे . हा दिवस शुभ मानला आहे ; पण तो सर्व कामांना नाही ; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात . आम्हाला समृध्द करणारी दिव्यता , ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे . भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते . घर असो किंवा कार्यालय …. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे . लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते . दिवाळीचा सण मोठा , नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहा

नरक चतूर्दशी विशेष

इमेज
     आज दिवाळीचा दुसरा दिवस अर्थात नरक चतूर्दशी . आजच्या दिवशी पहाटे लवकर  सुर्योदयापुर्वी उठून सुवासिक उठणे तेल आदी लावून स्नान करण्याची प्रथा आहे .आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या  नरकासुराचा वध केला , अशी आख्याईका आहे या बाबत श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे की                प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला , ‘ आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील , त्याला नरकाची पीडा होऊ नये. ’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘ नरक चतुर्दशी ’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग