पोस्ट्स

डिसेंबर ८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत केनिया संबंध होणार अधिक मैत्रीचे

इमेज
  केनिया , आफ्रिका खंडाच्या ईशान्य दिशेला जो गेंड्याचा शिंगासारखा भाग दिसतो ( त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असी संज्ञा आहे ) त्यांच्या खालच्या भागातील हिंदी महासागरातील देश . जो त्या देशापासून सुरु होणाऱ्या खचदरीमुळे विशेष प्रसिद्ध आहे . नॅशनल जीओग्राफी या चेनेलवर या देशातील प्राणिजगत देखील आपण अनेकदा बघीतले असेल    आपल्या भारता सारखाच वसाहातवादाचा शिकार झालेला देश म्हणजे केनिया . एकेकाळी क्रिकेटसाठी ओळखला जाणारा देश म्हणजे केनिया   हे सांगायचे कारण म्हणजे नुकतेच केनियाच्या   अध्यक्षांनी भारताचा तीन दिवसांचा केलेला तर मित्रानो , आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , यांच्या विशेष आमंत्रणावरून   केनिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष , . डॉ . विल्यम समोई रुटो यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह ४ ते ६ डिसेंबर दरम्यान भारताचा दौरा केला मागच्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर केनियाचे राष्ट्ट्राध्यक्ष   अध्यक्ष विल्यम रुटो यांचा हा फिलॅसिव्ह दौरा होता या आधी २०१७ साली त्यावेळचे राष्रट्राध्यक्ष उहुरु केन्य

नक्षलवाद्यांची सविस्तर माहिती देणारे पुस्तक :नक्षलनामा

इमेज
              सध्या आपल्या देशातील नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आलेल्या असला तरी, एकेकाळी या नक्षलवाद्याने देशातील सुरक्षा यंत्रणेची झोप उडविली होती. नक्षलवाद्यांकडून पोलीस प्रशासन, मुलकी प्रशासन (जिल्हाधिकारी, तहसीलदार  उपजिल्हाधिकारी या यंत्रणेस मुलकी प्रशासन म्हणतात)आणि स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हत्या करणे , ही रोजचीच बाब झाली होती. वृत्तपत्रांचे मथळे सातत्याने या नक्षलवादाने केलेल्या क्रूर क्रमाने भरलेले आढळत. देशासमोरच्या अंतर्गत प्रश्नाचा विचार करता, सर्वात महत्त्वाचा अंतर्गत प्रश्न म्हणून नक्षलवादाचा उल्लेख सातत्याने केला जात असे. देशाचा सुजाण नागरीक म्हणून आता काहीस्या थंडावलेल्या या प्रश्नांची आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या पुर्वेकडील भागाला असणाऱ्या प्रदेशात असणाऱ्या या समस्येबाबत मराठीत तशी मोजकीच पुस्तके लिहली गेली आहेत. त्यातही जी पुस्तके लिहली गेली आहेत त्यापैकी बहुसंख्य अन्य स्त्रोताचा संदर्भ घेवून लिहिलेली आहेत. लेखकाने प्रत्यक्ष त्या प्रदेशात फिरून नक्षलवादी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून मिळालेल्या माहितीनुसार लिहिलेली पुस्तके अजूनच तुरळक.. अन