पोस्ट्स

ऑगस्ट २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन बंडखोर कवियत्रीला

इमेज
            ती काळाचा पुढे बघणारी आधूनिक स्त्री होती, ती ज्ञानपीठविजेती कवियत्री आहे. ती हिंदी , पंजाबी भाषेतील ख्यातनाम कवियत्री आहे. फाळणीपुर्व पंजाबात सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबात तीचा जन्म झाला होता , तारुण्याचा अवखळपणात तीला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सासरच्या मंडळींकडुन प्रचंड अत्याचार सहन करावे लागले, मात्र यातूनच तीची कविता समृद्ध होत गेली.ज्या काळात एखाद्या स्त्रीने विवाहाच्या बंधनात न अडकता परपुरुषाबरोबर राहण्याची कल्पना करणे कोणाच्या मनात येणार नाही, अस्या काळात आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषाबरोबर लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिली ती. मी बोलत आहे, हिंदीतील ख्यातनाम कवियत्री ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम यांच्याविषयी. 31आँगस्ट हा त्यांचा जन्मदिवस   निमित्याने त्यांना विनम्र आदरांजली                त्या हिंदी पंजाबी भाषेतील ज्ञानपीठ मिळवणाऱ्या पहिल्या कवीयत्री होत्या   हिंदी चित्रपटातील उत्तमोत्तम गाण्याचे गीतकार असणाऱ्या शाहिर लूधीयानवी यांच्या बरोबरचे त्यांचे जीवन विशेष गाजले. मात्र त्यांची स्वतंत्र्य असी काव्यप्रतिभा होती . हे विसरुन चालणार नाही.   अमृता प्रीत