पोस्ट्स

ऑक्टोबर ९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

इमेज
                    "मरावे परी किर्तीरुपे उरावे" अशी आपल्याकडे एक मराठी महान आहे .  मनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव  आदराने घ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा  अर्थ आहे . भारतातील सिनेसृष्टीचा  विचार करता  कृष्णधवल सिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिने अभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिने निर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण त्यांचे नाव घ्यावेच लागेल  . त्यांचा मृत्यूस सन 2020 ऑक्टोबर 10 रोजी 56 वर्षे पूर्ण होत आहेत ,  त्या निमित्ताने त्यांचा स्मृतीला वंदन .                    जागतिक कीर्तीच्या टाइम्स मॅगझीनतर्फे विसाव्या शतकातील सर्वाधिक  उत्तम अश्या जगभरातील 100 उत्तम अश्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात मध्ये एकच भारतीय  चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता, तो चित्रपट म्हणजे  गुरुदत्त यांची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असणारा प्यासा हा चित्रपट . उणापुऱ्या 20 वर्षाचा कालावधीत त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला वेगळ्याच उंचीवर पोहोचवले. गुरुदत्त यांची सिने कारकीर्द जर अजून बहरली असती तर भारताच्या झोळीत