पोस्ट्स

अध्यात्मिक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शनी जयंती विशेष

इमेज
यंदा शुक्रवार 19 मे रोजी वैशाख महिन्याची अमावस्या आहे . भारतीय   तत्वज्ञानानुसार वैशाख आमवस्या ही शनी जयंती म्हणून ओळखली जाते . भारतीय पौराणिक मान्यतेनुसार वैशाख आमवस्या या   दिवशी भगवान सुर्याची प्रथम   पत्नी संज्ञाने सुर्याचे तेज सहन झाल्यामुळे ,  केलेल्या आपल्या प्रतिकृतीपासून शनीदेवाचा जन्म झाला , असी धारणा आहे .  शनीच्या मातेने प्रचंड तप , आराधना केल्यामूळे ती काळवंडली ज्याचा परीणाम शनी देवांचा रंगावर झाला ते , कृष्णवर्णीय झाले . या कृष्णवर्णीय मुलाचा भगवान सुर्यांना राग आला . त्यांनी त्यास हळू   चालण्याचा शाप दिला . पुढे एका ऋषींच्या शापामुळे अपंगत्व आल्याने ती   चालगती अजूनच मंदावली . माझ्या माहितीनुसार   भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेव वगळता अन्य ग्रहांची उतप्तीची कथा भारतीय पुराणात मिळत नाही . भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेवाची उत्पतची कथा जेव्हढी   रंजक आहे , तेव्हढाच खगोलीय ग्रह देखील शनी आहे          गेल्या क...

भाउबीज विशेष

इमेज
उद्या दिवाळीचा शेवटचा दिवस अर्थात भाउबीज , भाउ आणि बहीणीचा नात्याचा हा दिवस आजच्या दिवशी पुरुषाने आपल्या पत्नीचा हातचे न खाता , आपल्या बहीणीचा हातचे खाणे शुभ मानले जाते . आजच्या दिवशी यमुना नदीने आपला भाउ यम यास ओवाळले होते . त्यामुळे प्रसन्न होवून आजच्या दिवशी जी स्त्री आपल्या भावाला ओवाळेल , त्या दोघांना दिर्घायू मिळेल , असा आशिर्वाद दिला . ज्यामुळे याला यमद्वितीया असे देखील म्हणतात .     कायस्थ समाजबांधव    या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत - टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात . या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात . या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे . यम आणि यमी या भावा - बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे द...

बलीप्रतीपदा विशेष

इमेज
  उद्या  बली प्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा , या दिवशी   पत्नीने पतीला स्नान घालण्याची प्रथा आहे . आजच्या दिवशापासून गुजराती बांधवांचे आणि व्यापारी वर्गाचे नविन वर्ष सुरु होते . हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे समजले जाणाऱ्या साडेतीन मुहुर्तापैकी एक पुर्ण मुहुर्त असणाऱ्या आजच्या दिवशी नविन वस्तू , सोने आदी खरेदी करण्याची प् कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो . हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतातया दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ' इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो ' असे म्हणतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे . शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात . काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते . शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे . या शेणा...