पोस्ट्स

जानेवारी १९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेतकरी कर्जमाफी आणि बँकिंग प्रणालीची मूलभूत सूत्रे

इमेज
           सध्या सर्वत्र शेतकरी कर्जमाफीची चर्चा मोठ्या जोरात  सुरु आहे . शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची अवस्था सुधारते की नाही हा वादाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवूया . मात्र मी एम बी ए करत असताना शिकलेल्या बँकिंग विषयातील ज्ञानानुसार असे कर्ज माफ करणे हे बँकिंग प्रणालीच्या मूलभूत सुत्रासी पूर्णतः विसंगत आहे ते कसे विसंगत आहे हे सांगण्यासाठी आजचे लेखन .तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठात एम बी ए करताना  बँकिंग विषयात मी शिकलो की , बँकेचे मुख्य कार्य हे कर्ज देणे आहे , त्यासाठी आवश्यक असणारे भागभांडवल ती लोकांकडून ठेवीच्या स्वरूवपात स्वीकारते . लोकांनी ठेवी बँकेत ठेवाव्यात म्हणून ती त्यांना काही प्रमाणात व्याज देते . यासाठी आणि इतर आस्थापनावरील खर्च भरून निघण्यासाठी बँका या ज्यांना कर्ज देतात त्यांच्या कर्जावरील व्याज दर हा ते ठेवीदारांना देत असलेल्या दरांपेक्षा अधिक ठेवतात . कर्जावरील व्याजदरांमुळे मिळणाऱ्या नफ्यातून त्या इतर सर्व खर्च भागवतात . काही जण वरचे विवेचन वाचून म्हणतील याचा आणि शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा काय संबंध ? तर तो कसा आहे हे सांगण्यासाठी पुढचे ल