पोस्ट्स

ऑगस्ट ८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढदिवस एका मराठी म्हणीचा

इमेज
  आपल्या मराठीला म्हणी वाक्यप्रचार यांचा प्रचंड साठा लाभलेला आहे . यातील काही म्हणी, या लोकांच्या अनुभवातून, समाजाच्या चालीरितीतून जन्माला आलेल्या आहेत . तर काही म्हणी, वाक्यप्रचारांचा उदय होण्यामागे एखादी ऐताहासिक घटना कारणीभूत आहे. जसे पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील हानीमुळे सर्वश्व नाहीसे होणे यासाठी उदयास आलेली पानिपत होणे ही म्हण अथवा खुप मोठा पराक्रम केल्यास त्याचे वर्णन करायला वापरली जाणारी अटकेपार झेंडा रोवणे ही म्हण  .                1758साली आँगस्ट महिन्याच्या दहाव्या तारखेला झालेल्या अटकेच्या विजयाच्या  घटनेमुळे समस्त भारतीयांना आणि अफगाणिस्तानातील 1989पर्यत (युनाटेड सेव्हीयत  सोशालिस्ट रशियाने आक्रमण करण्यापर्यत) सत्ताधिश असणाऱ्या  सत्ताधिशांना मराठी सत्ता काय चीज आहे हे समजले. येत्या सोमवारी अर्थात 10आँगस्ट 2020रोजी या घटनेला तब्बल 262 वर्षे पुर्ण होत आहे .त्या निमित्ताने समस्त मराठी भाषिक जनतेला वंदन .                 सन 1962रोजी चीनने भारतावर आक्रमण केल्यावर महाराष्ट्रीयन असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या देशसेवेचा नेहमी दाखला देण्यात येतो. तो महान आहेच , मात्र याही