पोस्ट्स

फेब्रुवारी २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बदलत्या हवामानाचा फटका !

इमेज
आपल्या भारतात इंधनाच्या वाढत्या किमतीने लोकांचे जगणे अवघड केले असताना, पृथ्वी गोलाचा विचार करता आपल्या भारताच्या जवळपास दुसऱ्या बाजूला असणाऱ्या अमेरीकेतील आकाराने आणि अर्थव्यवस्थेचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असणाऱ्या टेक्सासमध्ये हवामानाने तेथील जनतेचे जगणे नरकप्राय केले आहे. तिथे अत्यंत हाडे गोठवणाऱ्या थंडीत घरे गरम करणाऱ्या हिटरसाठी आवश्यक असणाऱ्या वीजेचा अभूतपुर्व तूटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पिण्याचे पाणी देणाऱ्या पाइपलाईनला तडे गेल्याने काही भाग पाण्यापासून वंचित आहे. अचानक वीजेची मागणी प्रचंड वाढल्याने तेथील वीज वाहण्याची यंत्रणा मोडून पडली आहे. त्यामुळे काही भागातील वीज गेली आहे. परीणामी काही रुग्णालयातील रुग्णांना उपचाराविना घरी सोडण्यात येत आहे.  आणि हे घडतेयं जगातील महत्त्वाची महासत्ता असलेल्या अमेरीकेत . आणि याला कारणीभूत आहे, गेल्या कित्येक वर्षात पडली नाही असी थंडी. ही तीच अमेरीका आहे, जी दरदोइचा विचार करता जगात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करते.मात्र देशपातळीचा विचार करता चीन आणि भारत हे आमच्या इतकेच कार्बन उत्सर्जन करतात, त्यांनी स्वतःवर बंधने लादून घेतल्या