पोस्ट्स

ऑगस्ट ३१, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मंदीचे आरोग्यावरील संभाव्य परीणाम

इमेज
                    सध्या भारतात सर्वत्र आर्थिक मंदीची चर्चा होत आहे . मंदीच्या आर्थिक परीणामावर सरकार योग्य ती पाउले उचलेल , यात शंका नसावी . मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे , तीच्या सामाजिक परीणामावर , त्यातही मंदीमुळे व्यक्तींच्या  आरोग्याबाबत किंबहुना अधिक स्पष्टपणे सांगायचे झाल्यास लोकांच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परीणामाविषयी .                     आपल्या भा र तात आरोग्यिविषयी त्यातही मानसिक आरोग्याबाबत प्रचंड प्रमाणात अनास्था आहे . परीणामी जगमान्य प्रमाणाच्या तूलनेत  लोकसंख्येचा विचार केला असता आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञ अत्यंत कमी आहेत . त्यामुळे येणाऱ्या मंदीच्या काळात हातचे काम गेल्याने, आर्थिक ओढाताण झाल्याने   येणाऱ्या नैराश्यावर मानसिक ताणतणावांना भारतीय कसे सामोर जातात , हे बघणे आवश्यक आहे . माझ्यामते हा प्रश्न जर व्यवस्थित हाताळला न गेल्यास आगीतून फुफाट्यात अशी आपली परीस्थिती होउशकते . शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या रूपाने आर्थिक प्रश्न किती विक्राळ स्वरूप धारण करू शकतो , याचा आपण सर्वांनी अनुभव घेतला आहेत . त्याहून मोठा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो .