पोस्ट्स

एप्रिल १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धूम्रपान बंदी !

इमेज
   टिव्हीवर wion नावाची वृत्तवाहिनी बघत होतो. या वृत्तवाहिनीवर अनेक जागतिक घडामोडी सहजसोप्या ,भारतीय  उच्चाराच्या इंग्रजी भाषेत सांगितल्या असतात. Wion या वृत्तवाहिनीवर ग्रँव्हटाझ् नावाचा एक उत्तम कार्यक्रम बघाच. शांतपणे कोणताही आक्रस्ताळेपणा न करता जागतिक घडामोड यात सांगितली असते, असो.      मी बघीतलेल्या कार्यक्रमात न्यूझीलंड 2025 पर्यत धूम्रपान विरहीत देश करण्यासाठी उपाययोजत असल्याचे सांगितले होते.(हाच तोच न्यझीलंड आहे, ज्याने कोव्हिड 19 कोरोना या रोगावर जगात पहिल्यांदा यशस्वी नियंत्रण मिळवले. एकदा नियंत्रण मिळाल्यावर आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नाहीये) यासाठी 2004 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना सिगारेट न देणे. सिगारेट विकण्यासाठी आवश्यक  परवानगी किचकट करणे, ज्यामुळे कमी दुकानात सिगारेट विकली जाइल. धूम्रपानासाठीची वयोमर्यादा वाढवणे आदी उपाय योजले जात आहेत. देशातील वाढती कर्करोगाची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मरणासंपन्न व्यक्तींना इच्छामरणाचा अधिकार देणे. यासारखे जगाला आदर्श ठरणारे कित्येक कायदे न्युझीलंडमध्ये करण्यात आले आहे. महिलांचा मातृत्वविषयक अडचणींकडे लक्ष