पाकिस्तानचे बुमरँग
आँस्टेलियातील आदिवासी बुमरँग नावाचे शस्त्र वापरात,जे शिकारीच्यावेळी एखाद्या प्राण्याला फेकुन मारल्यावर सुरक्षीतपणे परत व्यक्तीचा हातात येते. मात्र आदिवासींनी प्राण्यास बुमरँग मारल्यावर ते एखाद्या वेळी फेकणाऱ्यास देखील इजा पोहचवते. असाच काहीसा बुमरँग उलटण्याचा अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे. स्वतः च्या फायद्यासाठी ज्या अफगाणिस्तानमध्ये धर्मांध तालिबानचे विषारी झाड लावले,त्याचीविषारी फळे आता पाकिस्तानला चाखावी लागत आहेत. पाकिस्तानचा अफगाणिस्तान मधील अँबेसी समोर झालेल्या शक्तीशाली स्फोटात पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधीलअँबेसिडर आणि त्यांचा डायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवार 2डिसेंबर रोजी रात्री हा स्फोट झाला.या दोघांचा मृत्यू अगदी थोडक्यात बचावला असे प्रसिद्धीपत्रक पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यामार्फत काढण्यात आले आहे. सयुक्त राष्टसंघात देखील याचा निषेध करण्यात आला यावरुन या स्फोटाची भीषणता आपण समजू शकतो भारताच्या विरूद्ध वापरता यावा यासाठी पाकिस्तानने दूबळ्या अफगाणिस्तानची निर्मिती केली.अफगाणिस्तानला दुबळा करण्यासाठी तेथील कट्टरतेला पाकिस्तानकडून...