पोस्ट्स

जुलै ३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्या धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवियो वदन्ति

इमेज
जूलै महिना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीचे वेध लागतात जसे जून महिन्या त पुरेसा पाउस न झाल्यास शेतकऱ्यांना  पुनर्पेरणीचे  वेध लागतात .  तर सध्याचा काळातील एकमेव महासत्ता (भारत चीन आगामी महासत्ता आहेत सध्या एकच महासत्ता असल्याचे मला वाटते )असणाऱ्या  युनाटेड स्टेट्स आॉफ अमेरीकेला आपल्या स्वातंत्र्यदिनाचे अर्थात  4th जूलैचे वेध लागतात चार जुलै ही तारीख अजून एका महत्वाचा गोष्टीसाठी ओळखली जाते ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा पुण्यतिथीचा दिनांक म्हणून.  2019साली या गोष्टीला 117  वर्षे पुर्ण होतील.  स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्क्रुतीला एका वेगळ्या उंचीवर जावून पोहचवले त्या आधी पाश्च्यात्य जगातात भारतीय संस्क्रुती च्या विषयी माहिती ऐवजी गैरसमजच जास्त होते .                  भारतीयांना पण वैदिक धर्माची नवी ओळख करुन दिली आजपण त्याचे नाव घेतले जाते यातच सर्व काही आले . त्यांनी केवळ आध्यात्मिक कार्यच केले असे नाही रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण  मठ याच्या माध्यमातून समाजकार्य सुध्दा केले.  त्या वेळच्या निद्रीस्त समाजाला जागृत करायचे महत्वाचे कार्य त्यांनी केले . पड्डूचेरीला ( जूने नाव पॉडेचरी )

टेनिसचा वर्षातील तिसरा कुंभमेळा

इमेज
                   आपल्या भारतात दर १२ वर्षांनी एका ठिकाणी  कुंभमेळा भरतो . सर्व भारतात अशी चार ठिकाणे आहेत . नाशिक , उज्जैन , प्रयाग आणि अलाहाबाद ही ती चार ठिकाणे . या चार स्थानांवर प्रत्येकी १२ वर्षांनी कुंभमेळा भरत असला  ( अर्धकुंभमेळ्याचा अपवाद करूया ) तरी,  जगात सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या खेळापॆकी एक असणाऱ्या टेनिसच्या बाबतीत दर फ्रेंच वर्षी  जगातील वेगवेगळ्या  ४ ठिकाणी टेनिसचा कुंभमेळा म्हणता येईल अश्या  स्पर्धा होतात . त्यांना ग्रँडस्लॅम  स्पर्धा म्हणतात . ऑस्ट्रोलियन ओपन , फ्रेंच ओपन , विम्बल्डन ओपन , आणि अमेरिकन ओपन या त्या स्पर्धा .  त्यापैकी विम्बल्डन ही  ग्रँड स्लॅम स्पर्धा १ जुलै ला सुरु झाली १४ जुलै पर्यंत ही स्पर्धा सुरु असेल .                   या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत . या चारही स्पर्धा  ३ वेगवेगळ्या प्रकारच्या कोर्टावर घेतल्या  जातात . अमेरिकन आणि ऑस्ट्रोलियन स्पर्धा या हार्ड कोर्टावर घेतल्या जातात. जे सिमेंट ने तयार केले जाते . फ्रेंच ओपन हे लाल मातीच्या मैदानावर खेळले जाते . तर सध्या लंडन मध्ये सुरु असणारे विम्बल्डन हे हिर