पोस्ट्स

ऑक्टोबर २३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरा अन्यांचा आदर्श घ्यावा

इमेज
                      आताच टीव्हीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या दरात दिवाळीनिमित्य वाढ करण्यात आल्याची बातमी बघितली,  आणि मला २०१६ साली  याच दिवाळीच्या कालावधीत तेलंगणा राज्य परिवहनाच्या  बसने  आरक्षण करून पुणे ते सोलापूर या  दरम्यान केलेल्या प्रवासाची आठवण झाली , मी त्याआधीही आरक्षण करून सदर मार्गावर प्रवास केला होता  , जो कमी गर्दीच्या कालावधीत केला होता . आणि दुसऱ्यांदा करत असलेला प्रवास हा गर्दीच्या कालावधीत केलेला होता . या दोन्ही प्रवसांदरम्यान मला आढळलेल्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी मी आजचे लेखन करत आहे . या दोन्ही प्रवासनादरम्यान मला आढळलेली गोष्ट म्हणजे दोन्ही प्रवास दरम्यान पुणे सोलापूर या दरम्यानचे भाडे सारखेच होते . जे त्या वेळच्या महाराष्ट्र्र राज्य परिवहन महामंडळाच्या त्याच दर्जाच्या बसेसच्या  कमीत कमी भाड्यापेक्षा तब्बल ४० रुपये कमी होते .  मात्र दोन्ही वेळेस मला आकारण्यात येणाऱ्या आरक्षण शुल्कात तब्बल ६६ टक्क्यांचा फरक होता . कमी  गर्दीच्या कालावधीत माझ्याकडून आरक्षण शुल्कापोटी १२ रुपये आकारण्यात आले होते . तर दिवाळी सणाच्या दरम्यान माझ्याकडून