पोस्ट्स

जुलै २१, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 2

इमेज
भारतीय रेल्वेच्या पसारा खूप मोठा आहे . रेल्वेच्या संचलनासाठी त्याची विभागणी 17 विभागात करण्यात आली आहे . या विभागाची विभागणी 68 उपविभागात करण्यात आली आहे . जसे नागपूर उपविभाग , भुसावळ उपविभाग , मुंबई उपविभाग वगैरे . तसेच रेल्वेच्या कार्याला साह्यभूत  ठरतील अश्या 16 उपकंपन्या देखील स्थापन करण्यात आल्या आहेत . या उपकंपन्यांतील 8  उपकंपन्यांची माहिती याचा आधी घेतली . आता  उरलेल्या कंपन्यांची ओळख करून घेऊ . ज्यांना आधी करून देण्यात आलेल्या कंपन्यांची ओळख करून घेयांची असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लीक करावे .   (1) RITS भारतासह भारताबाहेरील रेल्वेमार्गाचे प्राथमिक नियोजन करणे , त्यांची उभारणी,  त्यांचे संचलन आणि यासाठी करावयाचे  तांत्रिक तसेच अभियांत्रीकी साह्य यासाठी या उपकंपनीची स्थापना 1974 साली करण्यात आली . बांगलादेश , म्यानमार ,या शेजारीदेशांसह , केनिया इथोपिनीया ,बोस्टनवा , केनिया बेनिन आदी आफ्रिकी देशात या उपकंपनीने  आपली सेवा दिली आहे .  (2)CONCOR  रेल्वेच्या प्रसिद्ध अश्या उपकंपन्यांपैकी एक म्हणून CONCOR ओळखली जाते .  देशांर्गत आणि परदेशी माल  वाहतुकीसाठी

राष्ट्रकुल स्पर्धा , भारतीय माध्यमात न आलेल्या

इमेज
            कर्नाटक राज्यात सत्तेचा खेळ सुरु आहे . त्याचा बरोबर महाराष्ट्रात विधानसभा  निवडणुकीचे वारे वाहत आहे . अन्य काही राज्यात झुंडशाहीमुळे  अनेक लोकांच्ये बळी  जात आहे. काही राज्यात अतिरिक्त पावसामुळे तर काही राज्यात दुष्काळसदृश्य स्थितीमुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे.  या बातम्या आपण माध्यमातून बघतो , मात्र भारतात एव्हढेच सुरु नसून भारतात विविध ठिकाणी विविध खेळाच्या राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहेत .                दिल्ली येथे बुद्धिबळ या खेळाच्या  राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या . सध्या कटक या शहरात टेबल टेनिस   या खेळाच्या राष्ट्रकुल स्पर्धा मोठ्या दिमाख्यात सुरु आहे . प्रिया देशपांडे यांच्यासारखे अनेक खेळाडू बलाढ्य अश्या ऑस्ट्रोलिया आदी देशाच्या खेळाडूंना  सहजतेने  पराभवाचे पाणी पाजत आहेत  . दुर्देवाने भारतीय माध्यमात या विषयी फारशे काही बोलले जात नाहोये . एका हाताच्या बोटावर मोजता येईल एव्हढ्या देशात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट विषयच आपल्याकडे चर्चिला जातोय . त्यातील काही खेळाडूंच्या  निवृत्तीविषयी गहण चर्चा आपण करतो /मात्र सध्या देशाचे नाव जगात  गौरवशाली करण

अपघाती मृत्यू, एक गंभीर गोष्ट

इमेज
                           शनिवारी सायंकाळी टिव्हिवर बातम्या बघत  असताना एक बातमी ऐकली आणि मनात धस्स झाले. बातमी महाराष्ट्रात  शनिवरी झालेल्या अपघाताती मृत्यू संबधित होती . मृत्यकांमध्ये  बहुतांशी तरुणाई होती . त्यामुळे अजूनच गांभिर्य  वाढले . यातील सर्वाधिक मोठा अपघात पुणे सोलापूर रस्त्यावर होता . या मागच्या कारणाचा मी वेध घेतला असता मला काही बाबी निर्दशनास आल्या . त्या सांगण्यासाठी आजचा लेखनप्रपंच                     काही जण वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि सुरक्षेचे नियम लक्षात न घेतल्यामुळे हे मृत्यू झालेले आहेत ,असे म्हणत अधिक कठोर नियम लागू करण्याचा प्रस्ताव सादर करतील . जे मला बिलकुल मान्य नाही .माझ्या मते बहुसंख्य अपघात हे सदोष रस्त्यामुळे होतात . मी अनेकदा पुणे सोलापूर रस्त्यावर फिरलो आहे ,मला या रस्त्यावर काम सुरु असताना कुठेही त्याची माहिती देणारे फलक दिसलेले नाहीत . खराब रस्ते मधुनच दिलेले डायव्हर्सन्स , यामुळे  पुणे सोलापूळ रस्त्यावर बहुसंख्य अपघात होतात,  असे माझे निरीक्षण आहे . पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने सर्वत्र अशीच स्थिती असेल असे मानन्यास हरकत नसावी