पोस्ट्स

ऑगस्ट २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारताचा वाटा 3% की 12%

इमेज
भारतात जगाच्या ३ % वाहने आहेत मात्र एकूण रस्ते अपघाताच्या  विचार करता जगाच्या १२ % अपघात आपल्या भारतात होतात  ३ च्या चारपट संख्या १२ आहे हे विचारत घेतले असता आपल्या भारतातील अपघाताची समस्या किती गंभीर आहे हे समजून येते  मात्र रोजच्या जगण्यात फारसे महत्त्वाचं नसलेल्या  भावनिक मुद्यावरून राजकारण करणाऱ्या कोणत्याही राजकारणी व्यक्तीने याबाबत राजकारण केल्याचे आपणास दिसत नाहीये . एका अहवालानुसार अपघाताच्या कारणांमध्ये रस्त्याची दुर्दशा आणि अन्य मानवाच्या नियंत्रणात नसलेल्या निसर्ग आदी घटकांचा फक्त ३ ते ४% सहभाग असतो . ९६ ते ९७ % अपघात हे मानवी चुकांमुळे होतात . जे टाळणे सहजशक्य आहे . वाहतुकीचे नियम पाळल्यास हे अपघात टाळता येऊ शकतात . ज्यामुळे या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांसह अश्या अपघातात कायमचे अपंगत्व घेऊन  जगणाऱ्या व्यक्तीमुळे होणारे देशाचे नुकसान सहज टाळता येऊ शकते हे नुकसान टाळल्यामुळे या व्यक्तीचे देशाच्या प्रगतीत योगदान जोडले जाऊन आपल्या भारताची अधिक वेगाने प्रगती होऊ शकते .  वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करणे इतकाच छोटा अर्थ नाही .तर वाहतुकीच्या  सुरक्षिततेच