पोस्ट्स

जुलै २१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेव्हा नाशिककरांची मान गर्वाने ताठ होते

इमेज
                       गेल्या पंधरवड्यात समस्त नाशिककरांची मान  गर्वांचे ताठ व्हावी अशी घटना घडली, दुर्दैवाने समस्त मराठी माध्यमे करोना विषयक माहिती देण्यात व्यस्त असल्याने या घटनेकडे म्हणावे इतके लक्ष देण्यात आले नाही . त्यामुळे  मराठीभाषिक , लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच          तर मित्रानो, दर 2 वर्षांनी होणाऱ्या बुद्धिबळाच्या ऑलींपियाडच्या पुढील महिन्यात होणाऱ्या सोहळ्यासाठी भारताकडून पुरुष आणि महिला संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली . या संघाचे नेर्तृत्व नाशिकची शान असलेले भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे  (जागतिक क्रमवारीत 23) बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित गुजराथी करणार आहे . विदित यांच्या नेर्तृत्वाखाली 4 वेळा बुद्धिबळाचे विश्वविजेते असणारे विश्वनाथन आंनद यांच्यासह  महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतील विश्वविजेत्या असणाऱ्या कोनेरू हंपी खेळणार आहेत . सध्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे महाराष्ट्र आणि नाशिकचे बुद्धिबळाचे क्रीडाविश्व हेलकावे खात असताना नाशिकच्या एका युवा बुद्धिबळपटूंकडे भारताचे नेर्तृत्व करण्याची संधी मिळणे खरोखरीच नाशिककरांसाठी अभिमनाचीच बाब आहे . तामिळनाडू आ